Details
तब्बल २० वर्षांनी पडद्यावर आला ‘गांधी’!
05-Oct-2019
”
विनय गजानन खरे..
महात्मा गांधी हे नाव जगभरात गेलं नि गाजलं ते त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या जोरावर! भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देत त्याला दिशा देणाऱ्या नि इतरांना, भले मग बंडखोरीची प्रेरणा देणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी या मूळच्या वकिली पेशात असलेल्या इसमाचे नाव ‘महात्मा गांधी’ लोकांनी करून टाकले. फार कमी जणांना लोकांकडून उपाधी मिळते. तशी बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ उपाधी मिळाली. यावर एक चित्रपट बनवण्याची कल्पना सुचवणारे होते तत्कालिन नेते मोतीलाल कोठारी! स्वकीयांनी या विषयाला हात घालून चित्र निर्मितीचे धारिष्ट्य दाखवले नाही. किंबहुना १९८२ मध्ये पडद्यावर आलेला `गांधी’ पाहून तो तितका भव्य झाला असता का, हे शिवधनुष्य पेलवले असते का, की टुकार झाला असता यावर न बोलणेच बरे!
असो. काही वर्षांपूर्वी युनोने देशाचे राष्ट्रपिता म्हटले जाणारे आता विश्ववंदनीय ठरलेले म. गांधी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिन (१८६९) जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळण्याचे नि साजरा करण्याचे जाहीर केले. त्याआधीच देशाने ‘अत्र तत्र सर्वत्र’ गांधी नाव देत महत्त्व दिले आहेच. गेल्या काही काळात गांधीवाद – विचारांचा प्रसारही जोरदार झाला आहे. जैन इरिगेशनचे भंवरलाल जैन यांनी झपाटल्यागत कष्ट घेत जळगावात जैन हिल्सवर गांधी रिसर्च सेंटर सुरू केले. यात गांधी लोकांना अधिक कळावेत म्हणून दृक्श्राव्य माध्यमातून गांधी जीवनपटाची मांडणी केली आहे. एका अनोख्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही पाहयला मिळतो.
ज्या गांधी तत्त्वज्ञानाच्या प्रेमात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारणारे नेल्सन मंडेला पडले, त्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन इंग्लंडमधील रिचर्ड एटनबरो या व्यक्तीने परिश्रम घेत अभ्यासपूर्वक एका चित्रपटाची निर्मिती केली, तो होता गांधी! मूळचे गांधी इतके गाजलेले तर या ‘सरां’चा गांधी कसा नाही गाजणार? १९८२ हे वर्ष नि त्यानंतरची २-३ वर्ष या सिनेमाने जगभरात धूम माजवली. वस्तुतः हा विषय या व्यक्तीला १९६२मध्ये सुचवला गेला तो ३० जानेवारी १९५०ला गांधी हत्त्या झाल्यानंतर १२ वर्षांनी तत्कालिन नेते कोठारी यांनी. तर निर्मितीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिले. नेहरूंच्या हयातीत हा चित्रपट सेटवर जाऊ शकला नाही. तर पुढे १९६९मध्ये कोठारींचेही निधन झाले. त्यामुळे चित्रपट निर्मिती बारगळलीच. मात्र, पुढील काळात अन्य व्यापात बुडालेल्या रिचर्ड यांनी हा विषय विस्मरणात नेला नाही. त्यांनी आपला गांधी चरित्राचा अभ्यास अधिक सखोल केला. प्राथमिक चाचणी पटकथा तयार असूनही त्यात त्यांनी अधिकतेची-कल्पकतेची जोड भर घातली. पण, वास्तवतेला कुठेही तडा जाणार नाही यावर लक्ष केंद्रीत केलं. स्वकियांनी या विषयाला हात घालून चित्रपट निर्मिती करणं शक्य नव्हतं असं नाही. पण, तसं झालं नाही आणि त्यावर परिश्रम करून रिचर्ड यांनी गांधींसह स्वतःची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ अशी करून ठेवली.
गांधी विचाराने व्यक्तिमत्वाने विश्वाला भुरळ घातली असली तरी मनोरंजन जगाच्या दृष्टीने त्यांना पाहण्यासारखे काहीच नव्हते. तशातच काळाचा रेटा असा होता की, गांधी तत्त्वज्ञान ऐकायला, पाहयला चित्रपटगृहात कोण येणार? भारतीय चित्रपटाचा चेहरामोहरा त्याकाळी साठेबाज-भांडवलशहांविरोधात ‘शोले’ उगलणारा ‘अँग्री मॅन’ असा होता. त्यामुळे शिडशिडीत कृश शरीरयष्टी, हातात स्वतःच्या उंची एव्हढी काठी, धोतर गुंडाळलेला, अहिंसा, सत्याची कास धरणारा चेहरा चित्रपटाला यशस्वितेची, गल्ला भरायची खात्री देणारा नव्हता. त्यामुळे साहजिकच रिचर्ड यांना निर्माता शोधण्यासाठी ‘वणवण’ करावी लागली. स्वातंत्र्यासाठी देशभर पायपीट करून ‘वणवण’ फिरलेल्या गांधींना अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आणण्यासाठी रिचर्डना निर्मिती धनासाठी ‘वणवण’ करावी लागली.
अलिकडच्या काळातील ‘गांधीगिरी’ हा परवलीचा शब्द ठरला आहे. पण गांधी विचार, द्रष्टेपणा, व्यक्तिमत्व जगासमोर आणलं ते रिचर्ड यांनी. रूपेरी पडद्यावर गांधी कथा साकारण्याचे ठरवल्यावर निर्माता, अर्थपुरवठादार सापडत नाही म्हणून निराश न होता त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. या चित्रपटासाठी २.२ कोटी डॉलर उभे केले. काय, कसे, त्यांनी प्रसंगी आपल्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंप्रमाणे आपले सर्वस्व पणाला लावले. घरदार, पत्नीचे दागिने विकले. स्वयंपाकाच्या गॅसला देण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते म्हणे! (उठसूठ गांधीजप करणारे आपले तथाकथित पुढारी करतील असा त्याग?) पैशाअभावी स्वतःच निर्माता होण्याचे, निर्मितीचा ध्यास साकार करण्यासाठी त्यांनी उभी केलेली रक्कम त्यांची प्रखर इच्छाशक्ती दर्शविते. स्वतःच्या सर्व क्षमता पणास लावून अपार कष्ट घेणं निश्चितच कौतकास्पद ठरतं. प्रत्यक्ष चित्रिकरणावेळी त्यांनी कुठेच तसुभरही तडजोड केली नाही. खर्चाचा विचार करता त्यांना काटकसरीची गरज होती. त्यासाठी त्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे सहाय्य घेता आलं असतं. पण ते त्यांनी घेतलं नाही. देशी-परदेशी असा आप-परभाव न ठेवता निर्मितीमूल्यावर भर दिला.
संपूर्ण चित्रपटात प्रत्यक्ष संवादाची जवळपास सव्वाचारशेहून अधिक दृश्यं आहेत. ती जितकी अधिक तितकी संपादित (एडिटिंग) करण्याची कटकट अधिक! (अर्थात मनासारखं दृश्य चित्रित होत नाही, त्यावेळीही कट, कट असे म्हणावे लागतेच!) गांधीजींसारख्या नेत्याच्या अंत्ययात्रेचे चित्रिकरण त्यांनी ३ लाख लोकांची गर्दी जमवून चित्रित केले. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तशी गर्दी रिचर्ड दाखवू शकले असते. पण मग त्याला वास्तवतेचा ‘टच’ आला नसता! त्यांच्या यशात त्यांच्याबरोबर राबणाऱ्या चमूचेही (टीम) तेवढेच महत्त्व! तरूणपणापासून वृद्धावस्थेपर्यंतचा ‘गांधी’ शोधणे तेव्हढेच आव्हानात्मक काम! त्यासाठी त्यांनी बराच ‘तपास’ केला. अखेर बेन किंग्जले या नवख्या कलाकारात तो गवसला. गांधींची ‘बा’ मात्र त्यांनी भारतीय बनावटीची निवडली. वयाच्या अवघ्या २७-२८ वर्षी रोहिणी हट्टंगडी या दोघांनी ती भूमिका साकारली. त्यावेळी वृद्धत्वाच्या भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खरंच वृद्ध झालीय.
उत्तम अभिनय जाण-समाज, कथा, अशा बहुतांश सर्वच अंगांनी हा चित्रपट आगळावेगळा ठरला. आपल्या देशात दादासाहेब फाळकेंसह सत्यजित रे, गोविंद निहलानी, गुरूदत्त आदी उच्च दर्जाची कथानके घेऊन चित्रनिर्मिती करणारे दिग्दर्शक झाले. आताही आहेत. त्यांना रिचर्ड यांच्या पाऊलखुणावरून बरेच काही शिकता येऊ शकते. या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ‘सर’ हा किताब दिला. पण त्यांना याऐवजी स्वतःचे ‘डेकी’ हे टोपण नाव प्रिय होते. सेटवरही त्याच नावाने हाक मारण्याचा आग्रह असे! विलक्षण कर्तृत्त्ववान असलेल्या डेकी यांचे ज्यूरसिक पार्क, द ग्रेट एस्केप, आदी चित्रपटही यशस्वी ठरले. त्यांनी बारा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
योगायोग असा की, ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नाही अशी ख्याती असलेल्या ‘ग्रेट ब्रिटन’विरोधात अहिंसेच्या लढा देत स्वातंत्र्य मिळवले. त्याच हद्दपार केलेल्या ब्रिटिश वंशाच्या एकाने गांधींवर चित्रपट काढावा हा केवढा योगायोग! सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेल्या रिचर्ड यांचे वडील प्रख्यात केम्ब्रिज विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर आईने स्त्री हक्कांसाठी समाजात योगदान दिलेले! समाजभान तर वेगळेच, दोन मुलींना, त्याही यहुदी असलेल्या, दत्तक घेऊन योग्यवेळी त्यांची लग्नं लावून दिली. हे वेगळे पैलू! वृद्धावस्थेत ‘पेसमेकर’ बसवून त्यांची आयुष्याची लढाई चालू होती. वयाची नव्वदी गाठण्याआधीच त्यांच्या आयुष्य चित्रपटावर ‘द एंड’ची पाटी झळकली. अपार कष्ट घेऊन बनवलेल्या गांधींनी त्यांना हताश तर केले नाहीच. पण, पुरस्काराच्या यादीतही निराश होऊ दिले नाही. ऑस्करची ११ नामांकनं आणि आठ पुरस्कार त्यावर्षी त्यांच्या गांधीने मिळवली. २०१४च्या ऑगस्ट महिन्यात त्यांची जीवनयात्रा संपली. अशा महान निर्मात्यास गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्ताने आठवावे लागेल नाही का?”
विनय गजानन खरे..
“महात्मा गांधी हे नाव जगभरात गेलं नि गाजलं ते त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या जोरावर! भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देत त्याला दिशा देणाऱ्या नि इतरांना, भले मग बंडखोरीची प्रेरणा देणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी या मूळच्या वकिली पेशात असलेल्या इसमाचे नाव ‘महात्मा गांधी’ लोकांनी करून टाकले. फार कमी जणांना लोकांकडून उपाधी मिळते. तशी बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ उपाधी मिळाली. यावर एक चित्रपट बनवण्याची कल्पना सुचवणारे होते तत्कालिन नेते मोतीलाल कोठारी! स्वकीयांनी या विषयाला हात घालून चित्र निर्मितीचे धारिष्ट्य दाखवले नाही. किंबहुना १९८२ मध्ये पडद्यावर आलेला `गांधी’ पाहून तो तितका भव्य झाला असता का, हे शिवधनुष्य पेलवले असते का, की टुकार झाला असता यावर न बोलणेच बरे!”
असो. काही वर्षांपूर्वी युनोने देशाचे राष्ट्रपिता म्हटले जाणारे आता विश्ववंदनीय ठरलेले म. गांधी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिन (१८६९) जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळण्याचे नि साजरा करण्याचे जाहीर केले. त्याआधीच देशाने ‘अत्र तत्र सर्वत्र’ गांधी नाव देत महत्त्व दिले आहेच. गेल्या काही काळात गांधीवाद – विचारांचा प्रसारही जोरदार झाला आहे. जैन इरिगेशनचे भंवरलाल जैन यांनी झपाटल्यागत कष्ट घेत जळगावात जैन हिल्सवर गांधी रिसर्च सेंटर सुरू केले. यात गांधी लोकांना अधिक कळावेत म्हणून दृक्श्राव्य माध्यमातून गांधी जीवनपटाची मांडणी केली आहे. एका अनोख्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही पाहयला मिळतो.
“ज्या गांधी तत्त्वज्ञानाच्या प्रेमात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारणारे नेल्सन मंडेला पडले, त्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन इंग्लंडमधील रिचर्ड एटनबरो या व्यक्तीने परिश्रम घेत अभ्यासपूर्वक एका चित्रपटाची निर्मिती केली, तो होता गांधी! मूळचे गांधी इतके गाजलेले तर या ‘सरां’चा गांधी कसा नाही गाजणार? १९८२ हे वर्ष नि त्यानंतरची २-३ वर्ष या सिनेमाने जगभरात धूम माजवली. वस्तुतः हा विषय या व्यक्तीला १९६२मध्ये सुचवला गेला तो ३० जानेवारी १९५०ला गांधी हत्त्या झाल्यानंतर १२ वर्षांनी तत्कालिन नेते कोठारी यांनी. तर निर्मितीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिले. नेहरूंच्या हयातीत हा चित्रपट सेटवर जाऊ शकला नाही. तर पुढे १९६९मध्ये कोठारींचेही निधन झाले. त्यामुळे चित्रपट निर्मिती बारगळलीच. मात्र, पुढील काळात अन्य व्यापात बुडालेल्या रिचर्ड यांनी हा विषय विस्मरणात नेला नाही. त्यांनी आपला गांधी चरित्राचा अभ्यास अधिक सखोल केला. प्राथमिक चाचणी पटकथा तयार असूनही त्यात त्यांनी अधिकतेची-कल्पकतेची जोड भर घातली. पण, वास्तवतेला कुठेही तडा जाणार नाही यावर लक्ष केंद्रीत केलं. स्वकियांनी या विषयाला हात घालून चित्रपट निर्मिती करणं शक्य नव्हतं असं नाही. पण, तसं झालं नाही आणि त्यावर परिश्रम करून रिचर्ड यांनी गांधींसह स्वतःची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ अशी करून ठेवली.”
“गांधी विचाराने व्यक्तिमत्वाने विश्वाला भुरळ घातली असली तरी मनोरंजन जगाच्या दृष्टीने त्यांना पाहण्यासारखे काहीच नव्हते. तशातच काळाचा रेटा असा होता की, गांधी तत्त्वज्ञान ऐकायला, पाहयला चित्रपटगृहात कोण येणार? भारतीय चित्रपटाचा चेहरामोहरा त्याकाळी साठेबाज-भांडवलशहांविरोधात ‘शोले’ उगलणारा ‘अँग्री मॅन’ असा होता. त्यामुळे शिडशिडीत कृश शरीरयष्टी, हातात स्वतःच्या उंची एव्हढी काठी, धोतर गुंडाळलेला, अहिंसा, सत्याची कास धरणारा चेहरा चित्रपटाला यशस्वितेची, गल्ला भरायची खात्री देणारा नव्हता. त्यामुळे साहजिकच रिचर्ड यांना निर्माता शोधण्यासाठी ‘वणवण’ करावी लागली. स्वातंत्र्यासाठी देशभर पायपीट करून ‘वणवण’ फिरलेल्या गांधींना अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आणण्यासाठी रिचर्डना निर्मिती धनासाठी ‘वणवण’ करावी लागली.”
“अलिकडच्या काळातील ‘गांधीगिरी’ हा परवलीचा शब्द ठरला आहे. पण गांधी विचार, द्रष्टेपणा, व्यक्तिमत्व जगासमोर आणलं ते रिचर्ड यांनी. रूपेरी पडद्यावर गांधी कथा साकारण्याचे ठरवल्यावर निर्माता, अर्थपुरवठादार सापडत नाही म्हणून निराश न होता त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. या चित्रपटासाठी २.२ कोटी डॉलर उभे केले. काय, कसे, त्यांनी प्रसंगी आपल्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंप्रमाणे आपले सर्वस्व पणाला लावले. घरदार, पत्नीचे दागिने विकले. स्वयंपाकाच्या गॅसला देण्याइतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते म्हणे! (उठसूठ गांधीजप करणारे आपले तथाकथित पुढारी करतील असा त्याग?) पैशाअभावी स्वतःच निर्माता होण्याचे, निर्मितीचा ध्यास साकार करण्यासाठी त्यांनी उभी केलेली रक्कम त्यांची प्रखर इच्छाशक्ती दर्शविते. स्वतःच्या सर्व क्षमता पणास लावून अपार कष्ट घेणं निश्चितच कौतकास्पद ठरतं. प्रत्यक्ष चित्रिकरणावेळी त्यांनी कुठेच तसुभरही तडजोड केली नाही. खर्चाचा विचार करता त्यांना काटकसरीची गरज होती. त्यासाठी त्यांना प्रगत तंत्रज्ञानाचे सहाय्य घेता आलं असतं. पण ते त्यांनी घेतलं नाही. देशी-परदेशी असा आप-परभाव न ठेवता निर्मितीमूल्यावर भर दिला.”
“संपूर्ण चित्रपटात प्रत्यक्ष संवादाची जवळपास सव्वाचारशेहून अधिक दृश्यं आहेत. ती जितकी अधिक तितकी संपादित (एडिटिंग) करण्याची कटकट अधिक! (अर्थात मनासारखं दृश्य चित्रित होत नाही, त्यावेळीही कट, कट असे म्हणावे लागतेच!) गांधीजींसारख्या नेत्याच्या अंत्ययात्रेचे चित्रिकरण त्यांनी ३ लाख लोकांची गर्दी जमवून चित्रित केले. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तशी गर्दी रिचर्ड दाखवू शकले असते. पण मग त्याला वास्तवतेचा ‘टच’ आला नसता! त्यांच्या यशात त्यांच्याबरोबर राबणाऱ्या चमूचेही (टीम) तेवढेच महत्त्व! तरूणपणापासून वृद्धावस्थेपर्यंतचा ‘गांधी’ शोधणे तेव्हढेच आव्हानात्मक काम! त्यासाठी त्यांनी बराच ‘तपास’ केला. अखेर बेन किंग्जले या नवख्या कलाकारात तो गवसला. गांधींची ‘बा’ मात्र त्यांनी भारतीय बनावटीची निवडली. वयाच्या अवघ्या २७-२८ वर्षी रोहिणी हट्टंगडी या दोघांनी ती भूमिका साकारली. त्यावेळी वृद्धत्वाच्या भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खरंच वृद्ध झालीय.”
“उत्तम अभिनय जाण-समाज, कथा, अशा बहुतांश सर्वच अंगांनी हा चित्रपट आगळावेगळा ठरला. आपल्या देशात दादासाहेब फाळकेंसह सत्यजित रे, गोविंद निहलानी, गुरूदत्त आदी उच्च दर्जाची कथानके घेऊन चित्रनिर्मिती करणारे दिग्दर्शक झाले. आताही आहेत. त्यांना रिचर्ड यांच्या पाऊलखुणावरून बरेच काही शिकता येऊ शकते. या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ‘सर’ हा किताब दिला. पण त्यांना याऐवजी स्वतःचे ‘डेकी’ हे टोपण नाव प्रिय होते. सेटवरही त्याच नावाने हाक मारण्याचा आग्रह असे! विलक्षण कर्तृत्त्ववान असलेल्या डेकी यांचे ज्यूरसिक पार्क, द ग्रेट एस्केप, आदी चित्रपटही यशस्वी ठरले. त्यांनी बारा चित्रपटांचे दिग्दर्शन केले.”
“योगायोग असा की, ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नाही अशी ख्याती असलेल्या ‘ग्रेट ब्रिटन’विरोधात अहिंसेच्या लढा देत स्वातंत्र्य मिळवले. त्याच हद्दपार केलेल्या ब्रिटिश वंशाच्या एकाने गांधींवर चित्रपट काढावा हा केवढा योगायोग! सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेल्या रिचर्ड यांचे वडील प्रख्यात केम्ब्रिज विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर आईने स्त्री हक्कांसाठी समाजात योगदान दिलेले! समाजभान तर वेगळेच, दोन मुलींना, त्याही यहुदी असलेल्या, दत्तक घेऊन योग्यवेळी त्यांची लग्नं लावून दिली. हे वेगळे पैलू! वृद्धावस्थेत ‘पेसमेकर’ बसवून त्यांची आयुष्याची लढाई चालू होती. वयाची नव्वदी गाठण्याआधीच त्यांच्या आयुष्य चित्रपटावर ‘द एंड’ची पाटी झळकली. अपार कष्ट घेऊन बनवलेल्या गांधींनी त्यांना हताश तर केले नाहीच. पण, पुरस्काराच्या यादीतही निराश होऊ दिले नाही. ऑस्करची ११ नामांकनं आणि आठ पुरस्कार त्यावर्षी त्यांच्या गांधीने मिळवली. २०१४च्या ऑगस्ट महिन्यात त्यांची जीवनयात्रा संपली. अशा महान निर्मात्यास गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्ताने आठवावे लागेल नाही का?”
युनोमहात्मा गांधीराष्ट्रपितापंतप्रधान जवाहरलाल नेहरूइंग्लंडरिचर्ड एटनबरोरोहिणी हट्टंगडी

