Details
जनमताचा दणका द्या रे..
07-Oct-2019
”
गजानन तुपे, साहित्यिक व रंगकर्मी
gajanantupe2@gmail.com
आऽऽरे.. आरेऽ.. आरेऽ.. आरेऽ
अरे याऽऽरे.. आरेऽ.. आरेऽ.. आरेऽ..
यांना असंच सोडू नका रे..
जनमताचा “”दणका”” द्या रे..
पर्यावरणाचा करिती “”ऱ्हास””
मुक्या जीवांचा घेतात “”घास””
म्हणे साधतो आम्ही “”विकास””
मुंबई उकरून केली “”भकास””
जाब विचारू मिळून सारे..
जनमताचा दणका द्या रे..
यांना असंच सोडू नका रे..
जनमताचा दणका द्या रे..
बरं दिसत नाही हो “”लक्षण””
बंद करूया हो “”बोलबच्चन””
जरा देऊन यांनाही “”शिक्षण””
आरेचं करावं लागेल “”रक्षण””
साऱ्यांनी मनावर घ्या रे..
जनमताचा दणका द्या रे..
यांना असंच सोडू नका रे..
जनमताचा दणका द्या रे..
लागू करून संचारबंदी
तरण्या पोरांच्या करती “”अटका””
यांना आलाय कुठला “”झटका”” जनरेट्याचा ओढुया “”खटका””
“”वाचवा आरे””चे लावूया नारे..
“”जनमताचा”” दणका द्या रे..
यारे मिळून सारे, या रे..
जनमताचा दणका द्या रे..
”
आऽऽरे.. आरेऽ.. आरेऽ.. आरेऽ
जनमताचा दणका द्या रे..
जनमतमुंबईऱ्हासपर्यावरण