Details
hegdekiran17@gmail.com
“नव्या सामान्य स्थितीकडे हळूहळू पण मजबुतीने वाटचाल करतानाच, अनलॉक २.०ची संपूर्ण देशात तयारी सुरू असताना अनेक स्टार्टअप्सनी नव तंत्रज्ञानाचे आविष्कार जगासमोर आणले आहेत, तर काही त्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आपल्यापर्यंत विषाणू संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. आपण ज्याप्रकारे, संवाद साधतो किंवा प्रचंड कंटाळून गेलो आहोत, त्या स्थितीत थोडा सामान्यपणा आणण्यात टेक स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
“अनलॉक २.०ची तयारी करताना, आपण खालील काही टेक स्टार्टअप्स पाहुयात, ज्यांनी काही वेगळे उपाय सुचवले आहेत. या उपायांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सोल्युशन्स, इनडोअर एअर प्युरिफिकेशन आणि टेक ड्रिव्हन पार्किंग सोल्युशन्स यांचे संयोजन आहे.”
मॅहनेटो क्लिनटेकचे एअर सॅनिटायझेशन सोल्युशन
मॅग्नोटोचे अत्याधुनिक एअर क्लिनर कोव्हिड-१९चा प्रसार रोखण्यासाठी मदत करते. हवा स्वच्छ ठेवण्याचे मापदंड योग्य राखण्यासाठी मॅग्नेटो क्लिनटेकने त्यांच्या अत्याधुनिक मॅग्नेटो सेंट्रल एअर क्लीनरचे प्रगत व्हर्जन आणले आहे. आता या उत्पादनाला फिल्टरलेस मॅग्नेटिक एअर प्युरिफिकेशन (FMAP) आणि अल्ट्राव्हायोलेट (UVGI) तंत्रज्ञानाचीही जोड मिळाली आहे. ही ‘ट्रॅप अँड किल’ प्रक्रियेवर आधारीत उच्च क्षमतेची हवा शुद्धीकरण पद्धत आता अँटी मायक्रोबियल यूव्ही-सी रेंज हे घरातील हवेचे संपूर्णपणे विघटन करते. त्यातील ९० टक्के हवेतील विषाणू आणि संसर्गांना नष्ट करते. यानंतर त्यांची वाढ होत नाही.
कोव्हिड-१९सारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी देण्यात आलेल्या जागतिक औद्योगिक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत अगदी सूक्ष्म विषाणूंचा नायनाट करण्याची शक्ती वृद्धींगत करण्यासाठी मॅग्नोटो सेंट्रल एअर क्लीनरने आता मॅग्नेटिझम आणि यूव्ही-सीच या दोन्ही शक्तीचा एकत्रितपणे वापर करत आपले सामर्थ्य दुप्पट केले आहे.
“स्टॅक्यू या स्टार्टअपने नुकतीच, कोव्हिड-१९मध्ये उत्तम प्रतिसाद मिळावा, यासाठी विविध प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. सध्याच्या काळातील कोव्हिड-१९ आणि तत्सम संसर्गाचा प्रसार ओळखणे, त्यांचा माग काढणे आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रँड आपल्या मालकीचे व्हिडिओ अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म जार्विसचा उपयोग करीत आहे.”
“व्हिडिओ अॅनालिटिक्स हे नव्या सामान्य स्थितीतील सर्व नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे निरीक्षण करण्यासाठीचा मार्ग आहे. यातील सेवेत कोव्हिड-१९ ओळखणे, संशयिताचे ट्रेसिंग, पीपीई मॉनिटरींग, संरक्षण, सुरक्षा आणि आरोग्याचे विश्लेषण तसेच लोकांचे विश्लेषण या सर्वांचा समावेश होतो.”