Homeचिट चॅटबिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरात आज “संयमाची ऐशी तैशी”!

बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरीत करण्यात आले आणि त्याचा राजा म्हणून बिग बॉसने संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांची निवड केली आणि त्यांच्यासोबत दिले तीन सल्लागार.. स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम. “स्वर्ग की नरक”, या नॉमिनेशन टास्कसाठी.

स्वर्गात उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा तर बिग बॉसने दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले तर नरकात म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील हेही नॉमिनेट झाले.

आज घरामध्ये पार पडणार आहे संयमाची ऐशी तैशी, हे साप्ताहिक कार्य. आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार? आणि कोणाचा संयम तुटणार हे बघायला मिळेल. आज घर दोन टीममध्ये विभागले जाणार आहे. टीम A आणि टीम B. “संयमची ऐशी तैशी”, या कार्यामध्ये एका टीममधील म्हणजेच नरकातील सदस्य स्वर्गातील सदस्यांना कठीण-कठीण टास्क देत आहेत आणि या टास्कदरम्यान सदस्य एकमेकांना खडेबोल बोलताना दिसत आहेत.

आज स्नेहा सोनालीला सांगणार आहे “लोटांगण घालत झाडू मारा…  थांबायचं नाही, थांबायचं नाही…” आणि सोनाली हे करत असताना विशाल दादूसशी काहीतरी बोलायला आला असताना स्नेहाने त्याला बजावले “ओ तुम्ही मध्ये बोलायचे नाही…”

बिग बॉस मराठीच्या घरात काल पार पडले “स्वर्ग की नरक” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये स्वर्गात कोण जाणार आणि नरकामध्ये कोण जाणार हा निर्णय संपूर्णपणे दादूस यांचा होता. त्यांना तीन सल्लागारदेखील देण्यात आले होते. विशाल, स्नेहा आणि गायत्री. मीनल आणि विकास जेव्हा आपली बाजू मांडायला आले तेव्हा विशाल याने सल्लागार म्हणून त्याचे परखड मत मांडले, जे कुठेतरी विकासला अजिबात आवडले नाही.

विकासच्या मते विशालचा बालिशपणा त्यामधून कुठेतरी दिसून आला आणि त्याच्या विरोधात मुद्दे शोधले जात आहेत असेही त्याला वाटले. काल विकास या प्रकारामुळे भावुकही झाला. त्याला अश्रू अनावर झाले. विशालने असे वागणे आणि बोलणे त्याने कधीच एक्स्पेक्ट केले नव्हते. विशाल याचविषयी आज विकासशी बोलणार आहे.

विशाल विकासला म्हणतो, मला माझं मतं मांडायचे होते ना विकास. विकास म्हणतो, गायत्री माझ्या बाजूने बोलली, मग ती जास्त चांगली आहे माझ्यासाठी. मीनल आणि विशालचं म्हणणं पडतं, ठीक आहे मग तू तसा विचार कर. विकास म्हणतो, तुम्ही माझ्याविरोधात बोलत आहात. विशाल तू विरोधात नाही, तू विरोधात मुद्दे तयार केले आणि बोललास. तू आधीच ठरवलं होतंस तसं.

मीनल आणि विशाल म्हणतात, असं नाहीये, तुझा अविश्वास दिसून येत आहे, तू सिद्ध केलं. विकास म्हणतो, मीनल मी तुझ्याविरोधात कधीच काही बोललो नाही, तू माझ्याविरोधात बोललीस. कधीतरी अॅक्सेप्ट कर. तू स्वत:ची चूक मान्य कर. मीनल म्हणते, तू आता बोलतो आहेस सगळीकडे बोल तू…”

पुढे काय होते ते पाहू आज रात्री बिग बॉस मराठीत.. कलर्स मराठीवर..

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content