Homeपब्लिक फिगरपुरूषांनी स्त्रियांकडे पाहण्याची...

पुरूषांनी स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्राची अस्मिता, क्षास्त्रतेज, देशाचे, राज्याचे रक्षण, स्वधर्माचे, रयतेचे रक्षण, त्याचबरोबर महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्य त्याग करुन ईतिहास घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ साहेबांनी केले. आजच्या या दिवशी महिलांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे व पुरूषांनी स्त्रीचा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, अशी भावना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत पुण्यातल्या डॉ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, कोथरूड विधानसभा समन्वयक सविता बलकवडे, कस्तुरी पाटील, शिरीष फडतरे, स्वाती धमाळे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे, शेलार गुरूजी, अनिता शिंदे, जयश्री शिरसाट, उपस्थित होते.

महिला आणि समाजाच्या दृष्टीने स्वसंरक्षण महत्त्वाचे आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणी स्वसंरक्षणासाठी महिलांना प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यात आजतागायत दोन ते अडीच लाख महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या आक्रमकतेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून शक्ती विधेयक येत असल्याने यातून बऱ्याच महिलांना न्याय मिळेल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content