आयआयटीमध्ये या वर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीत किमान 75% गुण मिळवण्याचे पात्रता निकष शिथिल करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत याची घोषणा केली.
जेईई (ऍडव्हान्स) 2021 ही परीक्षा 3 जुलै 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. यावर्षी जेईई (ऍडव्हान्स) परीक्षा आयआयटी खरगपूर घेणार आहे, असेही ते म्हणाले.