Homeन्यूज ॲट अ ग्लांस'उदय' शुभंकर झाला...

‘उदय’ शुभंकर झाला ‘आधार’चा चेहरा!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ‘आधार’ शुभंकराचे नुकतेच अनावरण केले. लोकांना आधार सेवांचे चांगल्या पद्धतीने आकलन व्हावे यासाठी हे एक नवीन ‘रेसिडेंट फेसिंग’ संवाद माध्यम असेल. ‘उदय’ (Udai) नावाचा हा आधार शुभंकर आधारशी संबंधित माहिती अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.आधार सेवांचे अद्ययावतीकरण, प्रमाणीकरण, ऑफलाईन पडताळणी, निवडक माहितीची देवाणघेवाण, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वापर यांसारख्या अनेक विषयांवरील संवाद या शुभंकराच्या माध्यमातून सोपा होईल. माय जीओव्ही प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या एका राष्ट्रीय स्पर्धेतून ‘उदय’ची निवड करण्यात आली. याकरीता आलेल्या एकूण 875 प्रवेशिकांमधून केरळच्या अरुण गोकुळ यांची विजेते म्हणून घोषणा करण्यात आली.

शुभंकर तयार करण्याच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी, यूआयडीएआयने माय जीओव्ही प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय स्तरावर डिझाइन आणि नाव निवडीसाठी स्पर्धा आयोजित आयोजित केली होती. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यूआयडीएआयकडे देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि डिझाइनर्स यांच्याकडून 875 प्रवेशिका प्राप्त झाल्या. यात प्रत्येकाने ‘आधार’ त्यांच्यासाठी काय आहे, याचे एक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण केले. निवड प्रक्रियेत निष्पक्षता आणि अचूकता राखण्यासाठी बहुस्तरीय मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यात

केरळमधील त्रिशूरचे अरुण गोकुळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातील पुणे येथील इद्रिस दवाईवाला आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील कृष्ण शर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. शुभंकर नामकरण स्पर्धेत भोपाळच्या रिया जैन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पुण्यातील इद्रिस दवाईवाला आणि हैदराबादमधील महाराज सरन चेल्लापिल्ला यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.

यूआयडीएआयचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांनी तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात या शुभंकराचे अनावरण केले. या कार्यक्रमात विजेत्यांचा गौरव करण्यात आला. आधारचा संवाद अधिक सोपा, सर्वसमावेशक आणि भारतातील शंभर कोटींहून अधिक रहिवाशांसाठी अधिक सुसंगत बनवण्याच्या यूआयडीएआयच्या निरंतर प्रयत्नांतले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केले. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार म्हणाले की, एका खुल्या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे या शुभंकराचे डिझाइन आणि नाव निश्चित करण्यासाठी लोकांना आमंत्रित करून, यूआयडीएआयने आधारच्या मूळ तत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे. यूआयडीएआयचे उपमहासंचालक विवेक वर्मा म्हणाले की, हा शुभंकर एक सोबती आणि निवेदक म्हणून आपला प्रवास सुरू करत आहे. आधारशी संबंधित माहिती सहजपणे मिळवण्यासाठी त्याची मोठी मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...

रतन टाटांची जयंती उत्साहात साजरी

रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28...

कतरिना आणि हृतिकचं परस्परविरोधी जग आलं सोबत!

आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत परस्परविरोधी असलेली दोन जगं एकमेकांकडे आकृष्ट होतात व शेवटी एकत्र होतात. या दोन्ही कलाकारांशी केलेल्या...
Skip to content