केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
याकरीता सर्व संबंधित एनपीएस ग्राहकांनी:
1. त्यांनी आपली यूपीएस विनंती सीआरए प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखल करावी;
किंवा
2. संबंधित नोडल कार्यालयात 30.11.2025 रोजी किंवा त्यापूर्वी योग्यरित्या भरलेला प्रत्यक्ष अर्ज सादर करावा.
नोडल कार्यालयांमार्फत सर्व विनंत्यांवर विहित प्रक्रियेनुसार प्रक्रिया करण्यात येईल. यूपीएसअंतर्गत मिळणाऱ्या महत्त्वाच्या फायद्यांमध्ये पर्याय बदलणे, करसवलत, राजीनामा आणि निवृत्तीनंतरचे अनिवार्य फायदे आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आणि माजी निवृत्त होऊ घातलेल्यांना एनपीएसअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी त्यांचे यूपीएस अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
यूपीएसचा पर्याय निवडल्यास, कर्मचाऱ्यांना नंतर, अर्थात त्यांची तशी इच्छा असल्यास पुन्हा एनपीएसचा पर्याय निवडण्याची मुभा कायम राहील.

