Homeडेली पल्सभारताचे प्री-ओन्ड कार...

भारताचे प्री-ओन्ड कार मार्केट वेगाने वाढतेय!

भारताचा प्री-ओन्ड कार मार्केट 24-25 या आर्थिक वर्षामध्ये 5.9 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचला असून, तो 10% सीएजीआरने वाढत 2030पर्यंत 9.5 दशलक्ष युनिट्सपर्यंत जाईल, असे इंडियन ब्लू बुकच्या 7व्या आवृत्तीने स्पष्ट केले आहे. हा वार्षिक अहवाल कार अँड बाइक आणि वोक्सवॅगन प्री-ओन्ड सर्टिफाइड यांनी तयार केला आहे.

मार्केट ट्रेंड्स– अहवालानुसार मार्केटमध्ये प्रिमियमायझेशन आणि कन्सॉलिडेशनकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. एसयूव्ही, विशेषतः कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी वाढत आहे, तेही बजेट-जागरूक ग्राहकांमध्ये. ब्रँड लॉयल्टी मजबूत होत असून 42% ग्राहक पुन्हा त्याच ब्रँडची कार खरेदी करण्यास तयार आहेत आणि नॉन-मेट्रो ग्राहक प्री-ओन्ड कारच्या रिपीट खरेदीसाठी सर्वात उत्साही ग्रुप ठरत आहेत. एआय-सक्षम प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत असून, वाहन तपासणी, सर्टिफिकेशन आणि प्रिडिक्टिव इनसाईट्समुळे मार्केटमध्ये ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी वाढतेय. जनरेटिव एआय डिजिटल नेटिव्ह, रिसर्च-ड्रिव्हन ग्राहकांसाठी रिसर्च आणि खरेदीचा प्रवास बदलण्यास सज्ज आहे. जागरूक ग्राहकांच्या मागणीनुसार ऑर्गनाइज्ड प्लेयर्स हे तंत्रज्ञान जलदगतीने स्वीकारत आहेत.

मोहम्मद तुरा, एमडी अँड सीईओ, महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स, या बदलाबद्दल म्हणतात: “भारतीय युज्ड-कार मार्केट आता प्रगल्भ होत आहे. वाढत्या मागणीमुळे, मोबिलिटीच्या बदलत्या गरजांमुळे आणि युज्ड कार हा स्मार्ट, अ‍ॅस्पिरेशनल पर्याय म्हणून स्वीकारल्यामुळे. सर्टिफाइड वाहने, स्ट्रक्चर्ड वॉरंटी, सहज उपलब्ध फायनान्सिंग आणि एआय-सक्षम खरेदी प्रवासामुळे ऑर्गनाइज्ड प्लेयर्स ग्राहकांना अनोखी विश्वासार्हता देत आहेत आणि बाजारात मोठ्या संधी निर्माण करत आहेत.”

इंडियन ब्लू बुक सर्व्हेतील महत्त्वपूर्ण निरीक्षणे

  • ऑर्गनाइज्ड प्लेयर्स आघाडीवर: 70%पेक्षा जास्त ग्राहकांच्या मते ऑर्गनाइज्ड डीलर्स उत्तम सेवा, उच्च दर्जाची वाहने आणि योग्य प्रिमियम देण्यासारखा विश्वास देतात.
  • उच्च दर्जाच्या कारची मागणी: उच्च रेसिड्युअल व्हॅल्यू किंवा उत्तम बिल्ड क्वालिटी असलेल्या कारचा वापर अधिक काळ केला जातो आणि त्यांना आफ्टरमार्केटमध्येही मोठी मागणी असते.
  • प्रमुख वयगट: 4–7 वर्षे वयोगटातील कार्स ऑर्गनाइज्ड युज्ड-कार व्यवहारांपैकी 30% आहेत.
  • सेगमेंट अपग्रेड्स: ग्राहक हॅचबॅक→कॉम्पॅक्ट एसयूव्ही/सेडान → फुल-साइज एसयूव्ही असा अपग्रेड पथ अनुसरतात. यातून प्रिमियमायझेशनचा मजबूत कल दिसतो.
  • नॉनमेट्रो वाढ: 68% नॉन-मेट्रो खरेदीदार पुन्हा युज्ड कार खरेदी करण्यास इच्छुक आहेत—ऑर्गनाइज्ड प्लेयर्ससाठी ही मोठी संधी.
  • वॉरंटी महत्त्वाची: 66% ग्राहकांसाठी वॉरंटी सर्वात महत्त्वाचे अ‍ॅड-ऑन असून, मेट्रो आणि नॉन-मेट्रो दोन्हीकडे ती निर्णायक घटक आहे.
  • एआयचा वाढता वापर: सध्या फक्त 6% खरेदींमध्ये एआय टूल्सचा वापर आहे, पण हा आकडा येत्या काळात झपाट्याने वाढणार आहे.

जेन झेड ग्राहकांची भूमिकादेखील महत्त्वाची ठरत असून, त्यांच्यासाठी वाहन निवडताना लाइफस्टाईल फिट, सुरक्षा आणि दीर्घकालीन व्हॅल्यू या गोष्टी प्राधान्यक्रमात आहेत.

पुढील काळाचा अंदाज

भारताचा प्री-ओन्ड कार मार्केट जलदगतीने वाढत आहे आणि ऑर्गनाइज्ड प्लेयर्समुळे हा क्षेत्र अधिक पारदर्शक, टिकाऊ आणि तंत्रज्ञान-आधारित होतोय. सरकारच्या व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीमुळे नवीन पुरवठा पाइपलाइन तयार होत आहे, तसेच ग्राहकांना जबाबदारीने अपग्रेड करण्यास प्रोत्साहन मिळतेय.

इंडियन ब्लू बुकबद्दल

2016मध्ये सुरू झालेले इंडियन ब्लू बुक, हा भारतातील प्री-ओन्ड कार इंडस्ट्रीवरील सर्वात विस्तृत प्रायमरी रिसर्च रिपोर्ट आहे, जो मार्केट ट्रेंड्स, खरेदीदारांच्या वर्तणुकीवर आणि उदयोन्मुख संधींवर डेटा-आधारित अंतर्दृष्टी देतो.

कार अँड बाइकबद्दल

कार अँड बाइक हा भारतातील अग्रगण्य ऑटो-टेक प्लॅटफॉर्म असून, कंटेंट आणि कॉमर्ससाठी देशातील सर्वात मोठे हायपर-लोकल इंटीग्रेटेड नेटवर्क तयार करण्यावर कार्यरत आहे, ज्यामध्ये विश्वसनीय ऑटो डीलरशिप, पुरस्कार आणि खरेदी-विक्रीसाठी तंत्रज्ञान उपायांचा समावेश आहे.

महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्सबद्दल

महिंद्रा ग्रुपचा भाग असलेली महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स ही भारतातील अग्रगण्य मल्टी-ब्रँड युज्ड-व्हेईकल कंपनी आहे, ज्याचे फ्रँचायझी डीलरशिप नेटवर्क देशभर पसरलेले आहे. त्यांच्या सेवांमध्ये युज्ड-कार रिटेल, व्हेईकल ऑक्शन्स, इन्स्पेक्शन, यार्ड मॅनेजमेंट, प्राइस डिस्कव्हरी, फायनान्सिंग आणि वॉरंटी सोल्यूशन्सचा समावेश आहे.

वोक्सवॅगन प्री-ओन्ड सर्टिफाइडबद्दल

वोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचा हा सर्टिफाइड प्री-ओन्ड कार व्यवसाय असून, मल्टी-ब्रँड प्री-ओन्ड कारची खरेदी, विक्री आणि एक्सचेंज सुविधा तसेच सर्वसमावेशक तपासणी, वॉरंटी आणि सर्व्हिस पॅकेजेस प्रदान करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास...

‘हॅपी बर्थडे’, ‘कडाल कण्णी’ही ठरणार ‘इफ्फी’चे एक आकर्षण!

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी इफ्फी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ)बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या, आव्हान देणाऱ्या...
Skip to content