मुंबईतल्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक होत असून यात दोन विभिन्न विचारसरणीचे पॅनल परस्परांविरूद्ध उभे ठाकले आहेत. समाजवादी विचारसरणीचे माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे राष्ट्र प्रथम पॅनलचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. २२१ वर्षे जुन्या या एशियाटिक सोसायटीचे भवितव्य आज या दोघांपैकी एका पॅनलच्या हाती जाईल.
या दोन्ही पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
समाजवादी पॅनल-
कुमार केतकर (अध्यक्ष), प्रा. ए. डी. सावंत, प्रा. अर्जुन डांगळे, प्रा. दीपक पवार, सुनील कदम (सर्व उपाध्यक्ष), सी. एम. पॉलसेल (सचिव), भारत गोठोस्कर, इब्राहीम अफगाण, डॉ. कुंदा पी. एन., नंदिनी आत्मसिद्ध, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते (सर्व समिती सदस्य).
राष्ट्र प्रथम पॅनल-
डॉ. विनय सहस्रबुद्धे (अध्यक्ष), पद्मश्री रमेश पतंगे, प्रा. डॉ. संजय देशमुख, पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, (सर्व उपाध्यक्ष), विवेक गणपुले (सचिव), माधव भांडारी, डॉ. प्राची मोघे, डॉ. मल्हार कुलकर्णी, एड. राजेश बेहरे, वैजयंती चक्रवर्ती, प्रमोद बापट (सर्व समिती सदस्य), डॉ. माधवी नरसाळे, दत्तात्रय पंचवाघ, अमोल जाधव, अभिजीत मुळ्ये, मल्हार गोखले, उमंग काळे, स्नेहा नगरकर (सर्व छाननी समिती सदस्य).

