Homeचिट चॅटशहापूरच्या कन्या सुजाता...

शहापूरच्या कन्या सुजाता मडकेंची यशस्वी झेप, सरनाईकांकडून प्रशंसा

“यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील  सुजाता रामचंद्र मडके यांचे अभिनंदन केले आहे!

सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने केवळ ठाणे जिल्हय़ात नव्हे, तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवला आहे,असे प्रतिपादन मंत्रीमहोदयांनी केले आहे. ते म्हणाले की, साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत, आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत यांचा सुंदर संगम दिसून येतो. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठीही आशेचा किरण आहे. स्वप्न मोठे असावे, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळते, हे सुजाता मडके यांच्या यशकथेतून स्पष्ट जाणवते.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content