Homeकल्चर +'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५’चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेने कथानक, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच स्तरांवर उत्कृष्टतेचा ठसा उमटवत सांघिक प्रथम क्रमांक पटकावत मानाचा फिरता करंडक पटकावला.

स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष होते. महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, नागपूर, नाशिक, धुळे आणि पुणे अशा सहा केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. अंतिम फेरी 10 आणि 11 ऑक्टोबरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे घेण्यात आली. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून मराठी नाट्यसृष्टीतील तीन दिग्गज मान्यवर प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, प्रतिभाशाली लेखिका व अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे आणि जाणकार लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश शिरसाट यांनी परीक्षण समितीची धुरा सांभाळली. प्राथमिक फेरीचे परीक्षण नितीन धंदुके आणि श्रीकांत भिडे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभास पी. एन. जी. ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ आणि कार्यकारी संचालक पराग गाडगीळ तसेच दिग्दर्शक व मुख्य संयोजक अजय नाईक यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या कलावंतांचा यथोचित गौरव करण्यात आला. या स्पर्धेने मराठी रंगभूमीला नवी आणि गुणवान प्रतिभा दिली असून, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे असे मत सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे यांच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकासह रोख रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) आणि मानाचा फिरता दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करण्यात आला. न्यू आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स,अहिल्यानगर यांच्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावत रु. ७५,०००/- चे बक्षीस जिंकले, तर रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या ‘बरड’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकासाठी रु. ५१,०००/- प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त थिएटर मॅजिक यांच्या ‘तू ना जाने आसपास है खुदा’ आणि कलांश थिएटर यांच्या ‘मढं निघालं अनुदानाला’ या दोन एकांकिकांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...
Skip to content