Homeडेली पल्सआयआयएम अहमदाबादची दुबईतली...

आयआयएम अहमदाबादची दुबईतली पहिली शाखा सुरू

भारतातली आघाडीची व्यवसाय शिक्षण संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अहमदाबादच्या पहिल्या परदेशी शाखेचे (campus) उद्घाटन काल दुबईचे युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभाला भारताचे  शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आयआयएम अहमदाबादच्या दुबई शाखेचे उद्घाटन दुबईचे युवराज, महामहिम शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद  अल मकतूम यांच्या हस्ते होणे हा एक मोठा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पानुसार, भारताच्या शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दिशेने ही एक मोठी झेप आहे. आयआयएम अहमदाबादची दुबई शाखा भारतातील सर्वोत्तम गोष्टी जगासमोर घेऊन जाईल. आज, दुबईने आयआयएम अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय शाखेला स्थान देऊन विचाराने भारतीय आणि स्वरुपाने जागतिक या मूल्याला एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन कार्यवाहक मंत्री डॉ. अब्दुल रहमान अब्दुल मन्नान अल अवार यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांनी उच्च शिक्षणातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि ज्ञान क्षेत्रविषयक दुवा अधिक बळकट करण्यावर सहमती व्यक्त केली. यानंतर, प्रधान यांनी दुबईमधल्या मणिपाल विद्यापीठाच्या शाखेलाही भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सिम्बॉयसिस, बिट्स पिलानी, एमआयटी, ॲमिटी आणि इतर भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या प्राचार्यांसोबत गोलमेज चर्चा केली.

प्रधान यांनी संयुक्त अरब अमिरातीतले 109 भारतीय अभ्यासक्रम असलेल्या शाळांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. आखाती सहकार्य परिषदेतील इतर देशांमधली सीबीएसई शाळांचे आणि जगभरातील सर्व सीबीएसई शाळांचे प्राचार्य या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीतल्या 12 शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि सर्जनशीलता वृद्धींगत करण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्स सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content