Homeटॉप स्टोरीशिक्षक अभियोग्यताः राखीव...

शिक्षक अभियोग्यताः राखीव विद्यार्थ्यांनी द्यावी ४ दिवसांत माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीच्या (TAIT) ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या ३१८७ उमेदवारांनी आपली माहिती येत्या १५ सप्टेंबरपर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये द्यावी. त्यानंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २७ ते ३० मे २०२५ आणि ०२ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातल्या २६ जिल्ह्यांत एकूण ६० परीक्षाकेंद्रांवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला एकूण २,२८,८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण २,११,३०८ उमेदवार परीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६,३२० प्रविष्ट (Appeared) वि‌द्यार्थी / उमे‌दवारांपैकी २७८९ वि‌द्यार्थी / उमेदवारांचा निकाल २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर ०३ सप्टेंबर २०२५ रोजी ३४४ विद्यार्थी / उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ट (Appeared) वि‌द्यार्थी / उमेदवारांपैकी एकूण ३१८७ प्रविष्ट (Appeared) वि‌द्यार्थी / उमेदवारांनी २ मे २०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंक‌द्वारे अ‌द्यापही माहिती न भरल्याने अशा ३१८७ विद्यार्थी / उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यास्तव या उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२५पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल देण्यात यावा, असे आवाहनही ओक यांनी केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content