Homeन्यूज अँड व्ह्यूजहालचाल अधिक तर...

हालचाल अधिक तर मेंदू तल्लख…

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आपण घेत असलेला श्वासोच्छवास आणि शरीराची हालचाल यावर अवलंबून असते हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यासाठी दररोज किती चालावे, किती काळ व्यायाम करावा, किती काळ झोप घेणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टीही आता बहुतेक सर्वांना परिचित आहेत. हालचाल आणि रक्ताभिसरण यांचा जसा संबंध आहे तसाच रक्ताभिसरण आणि मेंदू यांचाही संबंध असतो. त्यामुळे दररोज काही ठराविक काळ जलद चालणे, नदीच्या वाहत्या अथवा स्विमिंग पूलच्या पाण्यात काही काळ पोहणे किंवा शरीर साथ देत असेल तर आपल्या इमारतीभोवती धावण्याचा सराव अथवा व्यायाम करण्यामुळे जर तुमच्या हृदयाचे ठोके मर्यादित प्रमाणात वाढत असतील तर तुमच्या मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही त्याची मदत होते असा निष्कर्ष दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने केलेल्या एका नव्या संशोधनातून निघाला आहे.

हा संशोधन प्रकल्प अमेरिकेतील एका आरोग्य संशोधन संस्थेतर्फे प्रायोजित केला गेला होता. त्यात प्राथमिकतेने असे दिसून आले की मध्यम ते अधिक अशी परंतु जोमदार शारीरिक कृती केली गेली तर त्यामुळे मेंदूमध्ये माहितीवर होणाऱ्या प्रक्रियेची गती अधिक होते आणि यामधून विशेषत: मध्यम आणि अधिक वयाच्या लोकांमध्ये त्याची स्मरणशक्ती आणि काम करण्याची ऊर्जा अधिक चांगली होऊ शकते. कोणताही शारीरिक व्यायाम करीत नसलेल्या मंडळींनी जेव्हा अशाप्रकारे शारीरिक हालचाल अथवा व्यायाम करायला सुरुवात केली तेव्हा केवळ पाच मिनिटे ही कृती केल्यानंतरदेखील सकारात्मक परिणाम बघायला मिळाला.

या संशोधनाचा भाग म्हणून ६७ ते ८० वर्षे वयाच्या ५८५ लोकांची तपासणी केली गेली. त्यात त्यांची झोप, दिवसभरात एकाच जागी बसून राहण्याचा कालावधी, हलकी शारीरिक कृती तसेच मध्यम ते अधिक व्यायामाचा कालावधी यांची माहिती नोंदवली गेली. त्यासोबतच काही प्रश्नोत्तरातून त्यांच्या आकलनशक्तीची चाचणी घेतली गेली. या सर्वातून ‘जलद श्वासोच्छवास कारायला लावणारी शारीरिक हालचाल आणि मेंदूचे आरोग्य यांचा संबंध असल्याचे दिसून आले. अधिक व्यायाम केलात तर मेंदूचे आरोग्य सुधारते असा निष्कर्ष निघाला. याबद्दल बोलताना विद्यापीठाचे संशोधक डॉ. मॅडिसन म्हणाले की, तुमच्या रोजच्या दिनक्रमात जारी असा थोडासा बदल करता आला तर त्याचे तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर निश्चित असे सकारात्त्मक परिणाम दिसतील. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत झोप, बसून राहण्याचा कालावधी आणि शारीरिक कृती असे तीन प्रमुख घटक असतात. यांचा एकमेकांशी असणारा संबंध आणि प्रतिसाद यावर आपले आरोग्य ठरते.

उदाहरणादाखल असे म्हणता येईल की, ज्यादिवशी आपल्या कामामुळे शारीरिक थकवा आल्याचे दिसते त्यादिवशी झोप चागली लागते आणि दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी तुम्हाला उर्जावान आहोत असे वाटेल. पण नेमका किती वेळ कोणत्या घटकासाठी खर्च करावा याचे उत्तर मात्र सुरुवातीला प्रत्येकालाच शोधून बघावे लागेल. संशोधनाचा एक भाग म्हणून असेही दिसले की हे व्यायाम कमी तीव्रतेचे असतील तर मिळणारे सकारात्मक परिणाम त्यामानाने कमी होणार आहेत. संशोधनातील निष्कर्ष प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगताना डॉ. ऑड्रे कॉलिन्स एक खास सूचना देत आहेत. दिवसाचे २४ तास असतात. त्यामुळे आपल्या प्रत्येक दिवसाचा वेळ आपण वरील तीन घटकांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटून देऊ शकता. किमान आठ तास तर झोपेत जाणार आहेत असे धरून उरलेल्या १६ तासांची स्वत:साठी विभागणी करता येईल. लक्षात ठेवायचे ते एकच की व्यायाम अथवा शारीरिक हालचाल यांना प्राथमिकता दिली तर मेंदूचे आरोग्य आणि पर्यायाने तुमचे उतारवयातील परावलंबी होणे कमी होऊ शकेल. आरोग्य ही धनसंपदा आहे असे म्हणतात ते उगाच नाही!

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...
Skip to content