Saturday, April 19, 2025
Homeचिट चॅटआमदार सचिनभाऊ चषक...

आमदार सचिनभाऊ चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा उद्या

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिनभाऊ अहिर चषक १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा उद्या, १८ मार्चला परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांनी शालेय क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे सातत्य यंदाही कायम राखले आहे. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

चँम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. सदर स्पर्धेमधील निवडक खेळाडूंना उन्हाळी सुट्टीदरम्यान होणाऱ्या मार्गदर्शनासह शालेय मुलामुलींच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेत मोफत संधी दिली जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघाचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर आदी मंडळी विशेष कार्यरत आहेत.    

Continue reading

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...
Skip to content