Homeकल्चर +'आरडी'तलं धमाल गाणं...

‘आरडी’तलं धमाल गाणं ‘वढ पाचची..’ लाँच

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील ‘आरडी’ चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची..” हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“वढ पाचची” हे अतिशय धमाल गाणं आहे. ‘पार्टी साँग’ म्हणता येईल असं हे गाणं आहे. गीतकार मंदार चोळकरलिखित कॅची शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी ‘आरडी’ चित्रपटातलं “वढ पाचची..” हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीतदिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content