Saturday, April 19, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसविरोधक लावणार मंत्र्यांच्या...

विरोधक लावणार मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीची माळ…

राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारसाठी गले की हड्डी बनलेला विषय, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे संपुष्टात आला आहे. पण, या नव्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात फटाक्यांची माळ लागावी, तशी मंत्र्यांच्या राजीनाम्याची माळ विरोधकांकडून लावली जाणार आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त विधान आणि त्यापाठोपाठ त्यांनी केलेले स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी नेमणुकीच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्य, यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरत आहेत. त्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मोबाईलवरून पाठवल्या गेलेल्या क्लिप्सच्या अनुषंगाने प्रसारित झालेल्या बातम्यांचा आधार घेऊन मंगळवारी शिवसेना उबाठा गटाने गोरे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर निदर्शने केली. गोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या या गटाने केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये विरोधकांकडून केली जाईल. पण, या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमीच आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर नव्या सरकारचे डिसेंबरमधील नागपूर हिवाळी अधिवेशन या विषयावरच गाजले होते. त्या अधिवेशनात या हत्त्येसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी जाहीर केली गेली. एकीकडे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारसाठी डोकेदुखी ठरलेला एक विषय काही प्रमाणात का होईना पण मार्गी लागला, असे वाटत असतानाच गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सुरू केली आहे. दुसरीकडे राजीनामा दिल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे धनंजय मुंडे यांनी केलेले ट्विट आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी कथन केलेले नैतिकतेचे कारण या विसंगतीमुळेही अजित पवार यांच्या पक्षाची आगीतून फुफाट्यात, अशी स्थिती मंगळवारी झाली आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्यात आणि शिन्दे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नाही, असा दावा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला होता. अधिवेनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी काहीशी बँकफूटला गेल्याचे चित्रही मंगळवारी दिसले.

Continue reading

अजित पवारबरोबर राहिलात तर कल्याण होते…

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी पुण्याच्या चिंचवडमध्ये पानाची टपरी चालवली आहे. पानाची टपरी चालवणारा अण्णा यांच्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते विधानसभेचा...

आपल्याला कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे नानाभाऊ..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे विधानसभेत बोलताना संसदीय भाषण न करता बहुतांशवेळा राजकीय स्वरूपाचे भाषणच करतात, हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सव्वादोन वर्षांच्या कारकिर्दीतही दिसून आले होते. त्याची आठवण त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत करून दिली आणि कॉँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी...

याला बसवा खाली.. नंतर निलेश राणे व भास्कर जाधवांमध्ये तूतू-मैमै!

लक्षवेधी सूचनांच्या विषयावरून झालेल्या गदारोळाच्या वेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यात तूतू-मैमै झाली. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलत असताना या गदारोळातच राणे यांनी भास्कर जाधव यांना उद्देशून, याला खाली बसवा, असे शब्द उच्चारले. त्यामुळे संतापून भास्कर...
Skip to content