Skip to content
Saturday, May 17, 2025
Homeमाय व्हॉईसबाळासाहेब असेपर्यंत महाराष्ट्रात...

बाळासाहेब असेपर्यंत महाराष्ट्रात मनमानी करता येत नव्हती भाजपला!

महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला जाणार याची चिंता बदमाश राजकारण्यांना नसली तरी ती सामान्य मराठी माणसांना नक्कीच आहे. गेल्या दहा वर्षांत तर महाराष्ट्रातील राजकारणाने टोक गाठलेले आहे. यात समाजकारण होरपळून जात आहे. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र गावगुंडांच्या ताब्यात जाताना पाहवे लागत आहे. सुमार दर्जाचे सोकॉल्ड पुढारी आपणच जनतेने तारणहार आहोत, अशा थाटात वावरताना दिसतात. विद्वेषाचे राजकारण तळागाळात पोहोचल्याने गाव आणि खेडी आज संघर्षासाठी सज्ज झाली आहेत, तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवरायांच्या या महाराष्ट्रात उघडउघड दुफळी माजली आहे. जातीयुद्ध पेटलं आहे.

एकेकाळी राज्याची अस्मिता काय असते हे आपल्याच महाराष्ट्राने दाखवून दिले. त्यातून प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. याच प्रादेशिक पक्षांची मदत भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस अशा राष्ट्रीय पक्षांना घ्यावी लागली. शिवसेनेनंतर अनेक छोटे-मोठे राजकीय पक्ष जन्मास आले. शेकडो संघटना तयार झाल्या. पुढेपुढे तर जातीवरून संघ आणि संघटनांचा धुमाकूळ झाला, अशा विविध संघटना नंतर प्रमुख पक्षांच्या बटीक म्हणून वावरू लागल्या.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची दीर्घकाळ युती राहिली. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत भाजपला मनमानी करता येत नव्हती. वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नेते बाळासाहेबांच्या प्रेमात होते. कारण बाळासाहेबांचा स्वभावच भल्याभल्यांना मोहिनी घालणारा होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसे जोडण्याची कला आणि हौस बाळासाहेब ठाकरे यांना होती. बाळासाहेब ठाकरे हवेत पण शिवसेना नको असे काँग्रेस पक्षातील आणि कम्युनिस्ट विचारांचे नेते म्हणायचे. कारण बाळ ठाकरे या नावातच मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे प्रेम होते. रोखठोक, सडेतोड आणि निर्भिड स्वभावाचे ठाकरे विशाल मनाचे आणि प्रेमळ स्वभावाचे होते.

मोदी-शाह जोडीचे राजकारण सुरू झाले आणि महाराष्ट्रावर गुजरातकडे पाहण्याची वेळ आली. गुजरातचे शाह-मोदी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करू लागले. भाजपाच्या माध्यमातून हे बदलते राजकारण शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर सुरू झाले. भाजपने शिवसेनेचा वापर करून घेतला आणि मुंबई महाराष्ट्रातील बस्तान त्या पक्षाने वाढवले. भाजपने शिवसेनेचा शिडीसारखा वापर करून घेतला. गुजरातच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा आकस आधी होताच. तो पुढे राजकारणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा झाला.

महाराष्ट्र

शेटजींचा पक्ष म्हणून भाजपची ओळख जुनी आहे. आताच्या काळात हा पक्ष पूर्ण कार्पोरेट पार्टी बनली आहे. भाजपच एकमेव राष्ट्रीय पक्ष आणि आम्हीच देशाचे तारणहार असे त्या पक्षाचे नेते भासवितात आणि तसा प्रचार करून घेतात. महाशक्ती असा शिक्का स्वतःवर मारून घेतला. त्यामुळे सत्तेसाठी तडफडणारे अन्य राजकीय पक्षातील नेते लोकप्रतिनिधी भाजपकडे वळतात. अनेकदा अशा कमजोर नेत्यांना भाजपचेच नेते ऑफर देतात. कार्यकर्ते खरेदी करण्याची कला व्यापारी वृत्तीच्या नेत्यांकडे असतेच. विरोधकांना सत्तेच्या प्रवाहात खेचून आणायचे. त्यासाठी अन्य मार्गांचा वापर करायचा हीच भाजपची रणनीती असते. सत्तेची, लाभाची पदे देऊन विरोधकांना संपवून टाकायचे हाच भाजपचा अजेंडा आहे, हे लपून राहिले नाही. सत्ता असली की वशीकरण वेगाने होते. विरोधी पक्षात दीर्घकाळ राहिलेला जनसंघ ते भाजप आज विरोधी शक्तींना, विरोधी विचारांना संपवू पाहतोय. लोकशाही म्हणजे केवळ सरकार बनविणे नव्हे तर लोकांचा आवाज मस्तवाल सरकारवर अंकुश म्हणून लोकशाही देशात विरोधकांची गरज तितकीच महत्त्वपूर्ण आहे.

Continue reading

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे उद्योग सुरूच आहेत. भारतीय जनता पक्षप्रणित तीन राजकीय पक्षांचे सरकार सत्तेवर आले. भाजप, शिवसेना (शिंदे...