Homeन्यूज ॲट अ ग्लांसशेअर बाजारात पहिल्या...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न झाल्याचा हा फटका मानला जात आहे. सरकारने अपेक्षित भांडवली गुंतवणुकीपेक्षा वित्तीय तूट नियंत्रित राखण्यावर जोर दिल्यानेही बाजाराची काहीशी निराशा झाली आहे. त्यामुळे सुरूवातीलाच सेन्सेक्स गडगडल्याचे समजते.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 87.15 या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत झालेली घसरण आणि कमजोर परदेशी संकेत यामुळे भारतीय बाजारात सुरुवातीला घसरण झाली असावी, असे सांगितले जात आहे. अर्थात पहिल्या अर्ध्या तासातच खालच्या पातळीवरून सेन्सेक्स 300 अंशांहून अधिक सुधारून वर आला. बँक निफ्टीही खालच्या पातळीवरून 350 अंश वर आला. निफ्टी मिडकॅप 500 तर स्मॉल कॅप इंडेक्सही खालच्या पातळीवरून 200 अंक सुधारली. निफ्टीमध्येही खालच्या पातळीवरून 75 अंशांची सुधारणा झाली. मात्र, ही रिकव्हरी फार काळ टिकू शकली नाही आणि सर्व निर्देशांक पुन्हा दहाच्या सुमारास दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर आले.

बाजार उघडताच विक्रीचा जोरदार मारा

सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराला लक्षणीय तोटा सहन करावा लागला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला आणि निफ्टी 50 निर्देशांक 23,250च्या खाली घसरला. सेन्सेक्स शनिवारच्या 77,505.96 च्या आधीच्या क्लोजिंगविरुद्ध 700 अंकांनी घसरून 76,791.09च्या पातळीवर गेला. निफ्टी 50 त्याच्या मागील 23,482.15च्या बंदच्या तुलनेत 23,319.35वर उघडला आणि एक टक्क्याने घसरून 23,246.55वर आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरल्याने मिड आणि स्मॉल कॅप विभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला. सकाळी 9:20च्या सुमारास, सेन्सेक्स 671 अंक किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 76,835वर आणि निफ्टी 50 219 अंकांनी किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून 23,263वर होता. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ₹ 424 लाख कोटींवरून जवळपास ₹ 419 लाख कोटींवर घसरले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना 5 मिनिटांत सुमारे ₹ 5 लाख कोटींचे नुकसान झाले.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content