Homeन्यूज अँड व्ह्यूजडीपसीकने प्रभावित एनविडीयाचे...

डीपसीकने प्रभावित एनविडीयाचे भारतीय कंपन्यांशी कनेक्शन!

जगभरात धुमाकूळ माजविणाऱ्या चायनीज एआय DeepSeekने सर्वाधिक प्रभावित एनविडीयाचे (NVIDIA) भारतीय आयटी कंपन्यांशी कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे.

डीपसीकने अमेरिकी चीप आणि AI जायंट कंपनी एनविडीयाला जबरदस्त फटका दिला आहे. आपल्याकडे कॉम्प्युटर/लॅपटॉप ग्राफिक्स कार्डसाठी एनविडीया परिचित आहे. मात्र, अनेक भारतीय कंपन्यांनी AIसाठी एनविडीयाशी करार केले आहेत. AI इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर, फायनान्सपासून अनेक क्षेत्रात AI टूल्स सध्या वापरले जात आहे. भारतातील AI लँडस्केप मजबूत करण्यात सर्वाधिक भरवसा सध्या या क्षेत्रातील बादशाह असलेली कंपनी एनविडीयावरच ठेवला गेलेला आहे.

डीपसीक

एनविडीयाशी हातमिळवणी असलेल्या भारतीय कंपन्या अशा-

१. रिलायन्स

२. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस OFSS

३. एल अँड टी टेक LTT

४. विप्रो

५. टाटा टेलिकम्युनिकेशन

६. इन्फोसिस

त्यामुळे सध्या तात्पुरती तेजी दिसत असली तरी येत्या काही दिवसात या भारतीय आयटी कंपन्यातही घसरणीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डीपसीक

    रिलायन्स: भारतात AI फ्युचर बनविण्याची योजना. AI इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर्स आणि भारतीय भाषांत लार्ज लँग्वेज मॉड्युल्स LLM विकसित करत आहे. सुपर कॉम्प्युटरपेक्षाही जास्त प्रभावी अन् अचूक मॉड्युलची निर्मिती.

    ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस: पॅरेंट कंपनी ओरॅकल कॉर्प ऑलरेडी एनविडीयाशी सहकार्याने मजबूत प्रदर्शन करत आहे. आता बँकिंग आणि इन्शुरन्स कंपन्यांना AIबेस्ड सेवा पुरवण्यासाठी OFSSचा करार, यातून कंपनीला 5 ते 10% अतिरिक्त नफा मिळविण्याची योजना.

    एल अँड टी टेक: भारतीय वैद्यकीय क्षेत्रात AIचा वापर वाढविण्याची योजना. एक हजार इंजिनीअर्सना सध्या AI टूल्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण दिले जात आहे.

    विप्रो: जनरेटीव्ह AIच्या मदतीने भारतीय हेल्थकेअर क्षेत्रात क्रांती आणण्याची योजना. इंटेलिजंट डॉक्युमेंट प्रोसेसिंग आणि प्रगत मेडिकल AI ॲप्लिकेशन विकसित करण्याची योजना.

    टाटा टेलिकम्युनिकेशन: क्रिटिकल कॉम्प्युटिंग सोल्युशन्स क्षेत्रासाठी करार. ॲडव्हान्स AI सॉफ्टवेअर्सचा वापर करून टाटा AI क्षमतेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची योजना.

    इन्फोसिस: डेटा जनरेशन आणि सिम्युलेशनसाठी एनविडीया AI प्लॅटफॉर्मचा वापर. GenAI जनरेशन AI पॉवर्ड सोल्यूशन्स विकसित करण्याची योजना.

    Continue reading

    यंदाच्या अधिवेशनात हौशे-नवशे-गवशांना बसणार चाप!

    येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच 'डिजिटल प्रवेशपास' व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले...

    हर्षद महेता, केतन परिखनंतर आता पुन्हा नवा महेता! एलआयसीचीही साथ!!

    सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' (सेबी)ने गुजरातमधील सुवर्ण निर्यातदार कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' आणि तिचे अध्यक्ष राजेश महेता यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शेअर बाजारात गाजलेल्या हर्षद महेता आणि केतन परिख घोटाळ्यापेक्षाही हा अतिप्रचंड...

    आता व्हा पूर्वीसारखे तरुण!

    वय वाढणे आणि म्हातारपण येणे हा निसर्गाचा नियम आहे, असे आपण मानतो. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की, आता तुमचे वाढणारे वय थांबवता येऊ शकते, इतकेच नाही तर म्हातारपणाकडून पुन्हा तारुण्याकडे रिव्हर्स प्रवास करणे शक्य आहे, तर तुमचा कदाचित...
    Skip to content