Homeबॅक पेजशेअर बाजारातल्या खरेदीपासून...

शेअर बाजारातल्या खरेदीपासून राहा दूर…

किरकोळ गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात शेअर बाजारात कोणत्याही नव्या खरेदी तसेच गुंतवणुकीपासूनही दूर राहावे; ग्लोबल सेंटिमेंट, मोमेंटम सध्या अतिशय कमजोर अन् मंदीचे आहेत.

  • भारतीय बाजारात कोविडनंतर सुरू झालेल्या रॅलीला ब्रेक; सप्टेंबर 2024पासून गेले पाच महिने सातत्याने घसरण. निफ्टी 22,000पर्यंत घसरण्याची भीती.
  • निफ्टी घसरण या लेव्हलवरच सीमित राहणार, याचीही बाजाराला शाश्वती नाही; अनेक तज्ज्ञांच्या मते, मंदीची रॅली 21,000पर्यंत जाऊ शकते.
  • भारतीय शेअर बाजार सध्या टाईम अन् प्राईस करेक्शन मोडमध्ये असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेहमीच्या सरसकट सूत्राने सध्या “बाय ऑन डीपस्” म्हणजे घसरणीत खरेदीचा फॉर्म्युला वापरू नका. ट्रेडर्स अन् फायनान्स चॅनेल्सना त्यांचा खेळ करू द्या. सर्वसामान्यांनी मेहनतीच्या कमाईच्या गुंतवणुकीबाबत तूर्तास रिस्क घेणे टाळावे. सध्याचे खराब ग्लोबल सेंटिमेंट अन् भारतीय बजेटपश्चात बाजारातील करेक्शन, मंदीच्या लेव्हल एकदाच्या सेटल होऊ द्या.
  • आता भारतीय बाजाराला बजेट ट्रिगरचा आधार आहे. मात्र, मोदी सरकार गेल्या 10 वर्षांतील मजबूत संख्याबळाच्या स्थितीत नसल्याने यंदाचे बजेट हे पॉप्युलरिस्ट, रेवड्यावाटू राहण्याची बाजाराला भीती आहे. तसे झाल्यास FII गुंतवणुकीवर परिमाण होण्याचीही भीती आहे.
  • “मेक इन इंडिया” स्टोरीने प्रत्यक्षात अजूनही पुरेशी सक्षमता गाठली नसल्याने FIIवरील अवलंबित्व कायम आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर पहिल्या आठवड्यातील तेजी नॅसडॅक, डाऊने गमावली.
शेअर

ग्लोबल सेंटिमेंट का झाले खराब?

  1. चीनचे नवे AI मॉड्युल डीपसीक बनले. आयओएसवर सर्वाधिक डाऊनलोड झालेले ॲप, ॲपलवर फ्री डाऊनलोडमुळे चॅट-जीटीपीला जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली आहे.
  2. अमेरिकेने कोलंबियावर 25 टक्के आयात कर लावला. ट्रम्प कोलंबियावरील टेरिफ 50%पर्यंत वाढवणार. कोलंबियातून अमेरिकेत सोने, ऑईल, कॉफी, फुलं यांची मुख्यतः आयात होते.
  3. ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत अनिश्चिततेमुळे जगभरातील मार्केटस् सावध पवित्र्यात आहेत.
  4. भारतासह जगभरात परदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या विक्रीची भीती कायम आहे.

Continue reading

का होतोय निरोगी आणि तरुण भारतीयांचा अचानक मृत्यू?

गेल्या काही काळापासून, निरोगी आणि तरुण भारतीयांच्या, विशेषतः तिशी आणि चाळीशीत असलेल्यांचा अचानक कोसळून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमार यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या बातम्यांपासून ते व्हायरल व्हिडिओंपर्यंत, या घटनांनी आपल्याला हादरवून सोडले आहे. जेव्हा आपण...

‘धुरंधर’मधले रहमान डकैतचे ‘ल्यारी’, जिथे फक्त रक्त भळभळते!

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमधील कराची शहरातील 'ल्यारी' या वादग्रस्त भागाला आणि तेथील रहमान डकैत आणि एसपी...

काय आहे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे?

कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात...
Skip to content