Homeटॉप स्टोरीमंत्रिमंडळातील समावेशावरून रंगणार...

मंत्रिमंडळातील समावेशावरून रंगणार नाराजीनाट्य…

महायुतीला राज्यातील जनतेने अभूतपूर्व यश दिल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाल्यानंतर सोमवारपासूनच त्या संभाव्य नाराजीनाट्याची झलक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिसून आली.

मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांचे तारणहार असलेल्या नितीन गडकरींची भेट घेतली आणि गाऱ्हाणं मांडलं. त्याचवेळी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दावा केला की मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असून ते नाराज नाहीत. पक्ष आणि सरकार दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे केंद्रीय पक्षाने काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. गडकरी यांना भेटून आल्यावर मुनगंटीवार यांनी मात्र आपले नाव केंद्राकडे पाठवलेल्या यादीत असताना वगळले कसे गेले, हा सवाल केला.

नाराजी

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सारं काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. मंत्रिमंडळातून वगळल्याचा धक्का बसलेले छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. माध्यमप्रतिनिधींच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, होय मी नाराज आहे. त्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललात का, असे पत्रकारांनी विचारताच भुजबळ उत्तरले, मी कशाला कुणाला विचारायला जाऊ. भुजबळ यांनी नागपूरमधून थेट नाशिकला प्रयाण केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते.

नाराजी

एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेतही वेगळे चित्र नाही. मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलेल्या मंत्र्यांनी नाराजी जाहीर करू नये, यासाठी शिन्दे आणि पवार यांच्या पक्षांमध्ये मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असून नंतर पुन्हा खांदेपालट केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेतीलही काही आमदारांनी नाराजी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांकडे बोलून दाखवली. भारतीय जनता पक्षाला प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी सतावणार असून संभाव्य नाराजीनाट्याची झलक सोमवारी विधिमंडळाच्या आवारातच बघायला मिळाली. ही नाराजी अधिवेशन संपेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content