Tuesday, December 3, 2024
Homeबॅक पेजचित्रलेखा खातू-रावराणे महाराष्ट्र...

चित्रलेखा खातू-रावराणे महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्ताधिकारीपदी चित्रलेखा खातू-रावराणे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सोमवारी त्यांनी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या उप अधिदान व लेखा अधिकारी म्हणून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे कार्यरत होत्या.

चित्रलेखा यांची २०११ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या संवर्गात सहायक संचालक म्हणून निवड झाली. या काळात देयके, निधी, व्यवस्थापन, लेखा इ. विषयामध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर २०१६ ते २०१९ या कालावधीत वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न नागरी पुरवठा येथे सहायक संचालक, अर्थसंकल्प म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. तसेच २०१९ ते २०२३ या कालावधीत कोषागार अधिकारी (राज्यस्तरीय) शासकीय जमा लेखांकन प्रणाली येथे उत्तम सेवा बजावली आहे. दरम्यान त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुंबई शहर विभागात निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी / उप अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

चित्रलेखा यांची वित्तीय कामावर उत्तम पकड असून प्रशासकीय कामाचीही त्यांना जाण आहे. विशेष म्हणजे त्या उत्तम लेखिका, निवेदिका आणि गायिका असून शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महामंडळात वित्तीय शिस्त आणण्याबरोबर लेखाविषयक कामकाजाला गतिमानता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

Continue reading

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांचे निधन

महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी उद्या बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार केले...

सफाळ्यात ८ डिसेंबरला शरीरसौष्ठव स्पर्धा

सफाळ्यातील अचानक मित्र मंडळाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे, सफाळे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मिथुन पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. पालघर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली आहे....

आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबईचे घवघवीत यश

मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई विभागाच्या मल्लखांबपटूंनी चमकदार कामगिरी करताना घवघवीत...
Skip to content