Homeकल्चर +'असा हा धर्मवीर…'...

‘असा हा धर्मवीर…’ सोशल मीडियावर

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘धर्मवीर – २’ या आगामी चित्रपटातील ‘असा हा धर्मवीर…’ हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २७  सप्टेंबरला हा चित्रपट मराठी आणि हिंदी, या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

धर्मवीर

आनंद दिघेंची वेगवेगळी रुपं दाखवणारं, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारं असे हे गाणं आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अविनाश – विश्वजीत या जोडीने संगीत दिले असून प्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे.

धर्मवीर

‘धर्मवीर – २’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे ‘धर्मवीर – २’मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.

धर्मवीर

सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघे या गाण्यात दिसतात. या गाण्यातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडते. त्यामुळे आता चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

धर्मवीर

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content