Homeचिट चॅट युवा पैलवान साईनाथ...

 युवा पैलवान साईनाथ पारधीचा गौरव

मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित, श्री गणेश आखाडा, भाईंदर यांच्या विद्यमाने नुकत्याच जॉर्डन (ओमान)मध्ये संपन्न झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत ५१ किलो ग्रिको रोमन विभागात कांस्यपदक मिळवणारा युवा पैलवान साईनाथ पारधी याचा खास गौरव करण्यात आला.

साईनाथ पारधी याचा सत्कार फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार गीता जैन यांनी केला. तसेच आखाड्याकडून बॅग व ट्रॅक सूट त्याला भेट देण्यात आली. मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मिलिंद लिमये यांनी साईनाथला मोबाईल भेट दिला. यावेळी श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नजरुद्दिन नायकवडी, मिरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष धृवकिशोर पाटील, वस्ताद रुपचंद मानेदेखील उपस्थित होते.

सुरुवातीच्या काळात साईनाथने कुस्तीचे धडे श्री गणेश आखाड्यात घेतले होते. त्यावेळी वसंतराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन साईनाथला मिळाले. सध्या साईनाथ जाणता राजा कुस्ती केंद्रात कसून सराव करतो. सालाबादप्रमाणे श्री गणेश आखाड्यातर्फे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त साईनाथचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रताप सरनाईक, मुझ्झफर हुसेन (कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस), अजित पाटील (अध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ) यांनीदेखील श्री गणेश आखाड्याला सदिच्छा भेट दिली.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content