Homeडेली पल्समहाराष्ट्रात मुख्यमंत्री व...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्री असतानाही महिलांवर अत्याचार

राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी काल केला.

मुंबईत टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. बदलापूरमध्ये तीन, साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पीडित मुलीच्या आईला पोलीसस्टेशनमध्ये १२ तास बसवून ठेवले, पोलिस दबावाखाली होते असे स्पष्ट दिसते. ज्या शाळेत हा गुन्हा घडला त्या शाळेतील संबंधित लोकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

ही घटना १२ तारखेला घडली व १५ तारखेला मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी बदलापुरात होते. पण त्यांच्यापर्यंत ही माहिती का पोहोचली नाही? राज्यातील महिला अत्याचाराच्या एका घटनेत तपास करून दोन महिन्यांत आरोपीला फाशी दिली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले. ही घटना कोणती व कोणाला फाशी दिली त्याचा खुलासा करावा व बदलापूरच्या नराधमालाही तातडीने फाशी द्यावी, असेही सव्वालाखे म्हणाल्या.

महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराची माहिती घेतली व पोलीसस्टेशनला भेट देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. बदलापूरच्या घटनेने देश हादरला. पण राज्य महिला आयोगाने तीन-चार दिवस या घटनेची दखलही घेतली नाही. त्या कुठे होत्या? हे काम बाल हक्क आयोगाचे आहे, माझे नाही, असे उद्धट उत्तर त्यांनी दिले. अशा बेजबाबदार व निष्क्रीय व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही बदलापूरच्या लहान मुलीबद्दल एक शब्दही काढला नाही. उलट कोलकात्याच्या घटनेवर त्या बोलत आहेत. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाने एका महिला पत्रकाराला अश्लिल भाषा वापरली. या महिला पत्रकाराचा दोन दिवस गुन्हा नोंद करुन घेतला नाही. या माजी नगराध्यक्षला अटक करा, अशी मागणीही सव्वालाखे यांनी केली.

बदलापूरसारख्याच घटना अकोला, नाशिक, ठाणे जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना व निष्क्रीय सरकार लक्षात घेऊन प्रदेश महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात नारी न्याय समिती स्थापन करणार आहे. या समितीत एक महिला वकील व पाच महिला सदस्य असतील, पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत तसेच समुपदेशन करण्याचे काम ही समिती करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content