महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्या सहयोगाने इंडियन ऑइल आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे शानदार उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले.
त्यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऍपेक्स काऊन्सिल सदस्य अभय हडप, राज्य कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शाह, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सहसचिव केतन चिखले आणि योगेश फणसाळकर, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे सचिव जयंत पाटील आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दादर शाखेचे शाखाधिकारी आशिष उपाध्याय उपस्थित होते.
यावेळी अजिंक्य नाईक म्हणाले की, लहानपणी कॅरम खेळात होतो त्यामुळे या खेळाची आवड आहे. एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि एमसीए म्हणजे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन त्यामुळे कॅरमला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांनी केले. उद्घाटनाला विश्वविजेते संदीप दिवे आणि राष्ट्रीय विजेती काजल कुमारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पुरुष एकेरी सामन्यांनी स्पर्धेला सुरुवात झाली.
पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे–
दिलीप सोसा (मुंबई) वि वि शिरीष पेंढारकर (मुंबई उपनगर) २५-४, २५-०
संजय भंडारे (मुंबई उपनगर) वि वि महेश कुपेरकर (मुंबई) १७-४, १६-३
दिलेश खेडेकर (मुंबई) वि वि महम्मद जावेद याकूब खान (ठाणे) १९-४, २५-०
शाबाज नासिर शेख (मुंबई उपनगर) वि वि संजय कोंडविलकर (रत्नागिरी) १८-२, १२-११
अनिल मुंढे (पुणे) वि वि चंद्रकांत तुपलोंढे (मुंबई उपनगर) २२-१, २५-५
मंगेश जागुष्टे (मुंबई) वि वि नासिर खान (मुंबई उपनगर) १३-१४, २०-२, २२-३
नंदू सोनावणे (पुणे) वि वि महेश शेट्ये (ठाणे) २३-७, २५-८
राहुल भस्मे (रत्नागिरी) वि वि राजेश खेडेकर (मुंबई) २४-४, ८-७
रोमित बगाडे (ठाणे) वि वि नीलांश चिपळूणकर १८-६, ११-९
कृष्णा वाघमारे (मुंबई) वि वि रघुनाथ वाघपंजे (मुंबई उपनगर) १८-१३, ११-७