पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज रात्री आणखी एक पदक मिळाले. ५७ किलो वजनी गटाच्या परुषांच्या कुस्तीत भारताच्या अमन शेरावतने बेथलेहॅम्सच्या डॅरिअन क्रूझचा लीलया पराभव करत कांस्यपदक पटकावले.
आज रात्री या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या सामन्यात सुरूवातीला दोन्ही खेळाडू परस्परांवर कुरघोडी करत पाच पॉईंटपर्यंत झुंझले. मात्र त्यानंतर अमनने उसळी घेत डॅरिअनला निष्प्रभ केलेआणि सामना १३ विरूद्ध पाच, असा घशात घातला. या लढतीत पदक पटकावणारा २१ वर्षांचा अमन सर्वात तरूण खेळाडू आहे.
आतापर्यंत या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पाच पदके मिळाली होती. मनू बाकरने दोन (एक सरबजीत सिंहसोबत) कांस्यपदके जिंकली. नीरज चोप्राला रौप्यपदक मिळाले. हॉकीत भारताला कांस्यपदक मिळाले. स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक मिळवले. त्यानंतर आता अमन शेरावतने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या आता सहा झाली आहे.