Thursday, November 21, 2024
Homeचिट चॅटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, काजल कुमारी विजेते 

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड, पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या विश्वविजेत्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद मिळविले.

संदिपने रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक मिळवला.  महिला एकेरीचा सामना अगदीच एकतर्फी झाला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीने मुंबईच्या अंबिका हरिथवर सहज विजय मिळवून रोख रुपये ८ हजरांचे ईनाम व चषक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने ठाण्याच्या झैद अहमदला  हरविले. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या उर्मिला शेंडगेने मुंबईच्या रिंकी कुमारीवर मात केली.

विजेत्या खेळाडूंना पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, क्रीडा जागृतीचे मुख्य प्रताप जाधव, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते, सदस्य संतोष चव्हाण आणि कॅरम असोसिएशनचे सचिव नंदू सोनावणे उपस्थित होते.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content