Homeकल्चर +अडीच दशकांनंतर अरुण...

अडीच दशकांनंतर अरुण कदम पुन्हा रंगभूमीवर!

हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

भद्रकाली प्रॉड्कशन आणि प्रसाद कांबळी निर्मिती `वस्त्रहरण’ या नाटकातून ते पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले असून या नाटकाचे पहिली तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राची लोकधारा, या कार्यक्रमाने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना आपली ओळख करून दिली.

त्यानंतर नटरंग या नाटकाने त्यांना सरी ग सरी, अशी बायको हवी, एकदा पाहवं करून, भटाच्या साक्षीने, पैसाच पैसा, भ्रमाचा भोपळा, बापाचा बाप, प्रतिक्रिया अशी नाटके मिळवून दिली.

काफिला हा त्यांचा हिंदी चित्रपटदेखील गाजला आहे. जुगाड, येरे येरे पैसा, लोणावळा बायपास, हृदयनाथ, घंटा, बाहुलीचे लगीन, धावाधाव, जनता जनार्दन अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. हत्यार, चलो दिल्ली, थँक्स माँ अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ते घराघरात पोहोचले आहेत. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आता ते पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना हसवण्यासाठी येत आहेत. 

Continue reading

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...

सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला....

का लवकर होतो तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग?

तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो? याचे उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटर येथील एसीटीआरईसीमधल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी यांनी केलेल्या एका जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीमध्ये असे प्रमुख अनुवांशिक...
Skip to content