Friday, November 22, 2024
Homeकल्चर +महाराष्ट्रातले ज्येष्ठ लोककलावंत...

महाराष्ट्रातले ज्येष्ठ लोककलावंत मानधनासाठी आसुसलेलेच!

राज्यात एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजनांसारख्या विविध योजनांचा बोलबाला सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ वयोवृद्ध कलावंत आणि साहित्यिकांचे दरमहा मिळणारे दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या बँकेतच जमा झाले नसल्याने अनेक ज्येष्ठ लोककलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सरकारचे “लाडका लोककलावंत” नाही का? असे सवाल लोककलावंतांनी राज्य सरकारला  केला आहे.

यंदा अर्थसंकल्प सादर करताना, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना यांच्यासह अशा अनेक विविध योजना घोषित केल्या आहे. मात्र आहेत त्याच योजनांची  अंमलबजावणी होत नसेल तर या नवीन योजनाचा काय उपयोग काय? अशा शब्दांत अनेक तमाशा कलावंतांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलाकार सन्मान मानधन योजनेतर्गत राज्यशासन पूर्वी “अ, ब, क” अशा वेगवेगळ्या श्रेणीनुसार ज्येष्ठ कलावंतांना मानधनाचा लाभ देत होते. मात्र एप्रिल 2024पासून त्यांना सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. यामुळे सुमारे 34 हजार लाभार्थ्यांसाठी सांस्कृतिक खात्याला दरमहा 17 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. मात्र सध्या सरकारचा आर्थिक डोलारा कोलमडल्यामुळे दोन महिन्यांपासून राज्यातील लोककलावंतांच्या बँक खात्यात मानधन  जमा झालेले नाही.

काही लोककलावंत या मानधनावर आपला औषधोपचार घेत असतात. जर वेळेत मानधन आले नाही तर, अनेक कलावंत एक दिवस अन्नाला महाग असतात. काहींना औषधं घ्यायला पैसे नसतात, असे एका कलावंताने सांगितले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने मानधन योजनेचा लाभासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची नवीन सुविधा उपलब्ध केली आहे. आधार कार्ड लिंक केल्याशिवाय अनेकांना मानधन योजनेपासून वंचित राहवे लागत आहे. या अशा अनेक प्रश्नांवरही लोककलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमचं आयुष्य लोकपरंपरा जपण्यासाठी पारंपारिक हलगी-ढोलकी वाजविण्यात गेली. आम्ही अशिक्षित कलावंत आहोत. त्यामुळे हे ऑनलाईन काय प्रकार आहे, फॉर्म कसा भरायचा याचे काही कळत नाही. शेवटी इकडंतिकडं जाऊन, रांगेत उभं राहून फॉर्म भरा. त्यासाठी पैसे मोजा. असा अनेक त्रास आमच्यासारख्या गोरगरीब कलावंतांना सहन करावा लागतो.. असेही सांगली जिल्ह्यातील तमाशा कलावंताने नमूद केले.

दरम्यान, या विषयाची फाईल क्लिअर झाली असून उद्यापर्यंत या कलावंतांच्या खात्यात मानधन जमा होईल, असे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितले.

Continue reading

मी गुलाबी.. तू गुलाबी.. जग गुलाबी.. अजितदादांचा नवा फंडा!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडे वरचेवर गुलाबी जॅकेटमध्ये दिसतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण शेकडो प्रकाराचे रंग बघत असतो. हे रंग आपल्या जीवनात एक नवीन भूमिका बजावत असतात. आपल्या मूडवर या रंगाचा बहुतांशी परिणाम होतो. इतकेच नव्हे, तर रंगाचा आपल्या...

हलगी-ढोलकीच्या जुगलबंदीने रंगला ढोलकी तमाशा महोत्सव

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 26 मार्च ते 31 मार्च 2024 यादरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात आयोजित केलेल्या "ढोलकी तमाशा महोत्सवा"मध्ये हलगी-ढोलकीची जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपरिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या  लावण्या, सवाल-जवाब, शिलकार, फार्सा, वगनाट्य आणि शेवटीची भैरवीसुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कलारसिकांना...

लोककलावंतांच्या विस्मरणात न जाणारे विलासराव!

लोककलावंतांच्या कधीही विस्मरणात न जाणारे विलासराव! लोककलेचे आत्मीयतेनं जतन व्हावे आणि लोककलावंतांना सन्मानाची वागणूक मिळावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश! त्यामुळे त्यांच्या तळमळीला आणि सक्रियतेला लोकलावंतांच्या हृदयात नेहमी मानाचे स्थान मिळाले. विलासराव कधी अधिकाऱ्यांवर अवलंबून सांस्कृतिक कार्य खात्याचे निर्णय घेत...
Skip to content