Thursday, November 7, 2024
Homeपब्लिक फिगरवृक्षारोपणाचे फोटो करा...

वृक्षारोपणाचे फोटो करा ‘मेरी लाइफ’वर अपलोड

पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या मनावर रुजावा यासाठी राज्यात येत्या ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात काढलेली छायाचित्रे ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ आणि केंद्र सरकार पुरस्कृत ‘एक पेड माँ के नाम’, या मोहिमेअंतर्गत मेरी लाइफ (Meri LiFe) पोर्टलवर (https://merilife.nic.in) अपलोड करावीत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

चिमुकल्यांची वसुंधरा आणि केंद्र पुरस्कृत “एक पेड माँ के नाम” या मोहिमेअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक बालकाच्या नावे वृक्ष लागवड करून त्यावर त्या बालकाचे व त्यांच्या आईचे नाव लिहावे आणि त्या वृक्षाचे बालकाच्या पालकांकडून संवर्धन व जोपासना करण्यात यावी. झाडाच्या प्रजाती, स्थान आणि लागवड तारीख आदी माहितीचे अंगणवाडीस्तरावर जतन करण्यात यावे, अशा सूचना राज्यातील अंगणवाड्यांना दिल्या आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे फोटो मेरी लाइफ (Meri LiFe) पोर्टलवर अपलोड करावीत, असेही त्या म्हणाल्या.

या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरच्या उपाययोजनांना चालना मिळेल आणि एक लोकचळवळ होऊन पर्यावरण रक्षणासाठी आपण स्वतः काय केले ही भावना लहान वयातच मुलांच्या मनामध्ये रुजेल, असेही तटकरे यांनी सांगितले.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content