लोकसभेतले विरोधी पक्षनेते पाहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे निर्माण झालेल्या लोकसभेतील व्यत्ययांमुळे राज्यपालांच्या अभिभाषणावरील एका दिवसाने लांबली. या विषयावरील चर्चा 1 जुलैला सुरू होऊ शकली. 18 तासांपेक्षा जास्त काळ झालेल्या चर्चेनंतर 2 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला उत्तर दिले.
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेतील कामकाजाबद्दल काल नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. लोकसभेत खासदार अनुराग ठाकूर यांनी चर्चेला सुरुवात केली तर खासदार बांसुरी स्वराज यांनी चर्चेला अनुमोदन दिले. एकूण 68 सदस्यांनी चर्चेत भाग घेतला तर 50हून अधिक सदस्यांनी सभागृहाच्या पटलावर आपली भाषणे मांडली. लोकसभेत सुमारे 34 तासांच्या एकूण 7 बैठका झाल्या आणि एक दिवसाचे कामकाज वाया जाऊनही उत्पादकता 105% इतकी राहिली, असे ते म्हणाले.

18व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या सत्राची व राज्यसभेच्या 264व्या सत्राची सुरुवात अनुक्रमे 24 व 27 जूनला करण्यात आली. लोकसभा 2 जुलैला संस्थगित करण्यात आली, तर राज्यसभा काल, 3 जुलैला संस्थगित करण्यात आली. लोकसभेतील पहिल्या दोन दिवसांचा वेळ लोकसभेतल्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी राखून ठेवला गेला होता. अधिवेशनादरम्यान एकूण 542 सदस्यांपैकी 539 सदस्यांनी शपथ घेतली.
शपथ देण्यासाठी राष्ट्रपतींनी भर्तृहरी मेहताब यांची नियुक्ती हंगामी सभापती म्हणून केली होती. तसेच सुरेश कोदीकुन्निल, राधा मोहन सिंग, फगन सिंग कुलस्ते, टी आर बालू आणि सुदीप बंदोपाध्याय यांची नियुक्ती शपथ देण्यासाठी करण्यात आली होती. लोकसभा सभापतीपदासाठी 26 जूनला निवडणूक घेण्यात आली आणि त्यात ओम बिर्ला यांची आवाजी मताने लोकसभेचे सभापती म्हणून करण्यात आली. त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या मंत्रिमंडळाची ओळख करून दिली.

27 जूनला राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आणि सरकारच्या भूतकाळातील कामगिरीचा तपशील दिला आणि देशाच्या भविष्यातील विकासाचा पथदर्शक आराखडादेखील तपशीलवार सादर केला. 27 जूनला पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची राज्यसभेत ओळख करून दिली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील दोन्ही सभागृहांमधील चर्चेचे 28 जूनला नियोजन करण्यात आले. पण लोकसभेत ती सुरू होऊ शकली नाही. राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चा 28 जूनला खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सुरू केली. खासदार कविता पाटीदार यांनी त्याला अनुमोदन दिले. एकूण 76 सदस्यांनी 21 तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत भाग घेतला आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, 3 जुलैला उत्तर दिले. राज्यसभेची एकूण उत्पादकता 100%पेक्षा जास्त राहिली, असे किरण रिजिजू म्हणाले.