Homeएनसर्कलशेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी नियंत्रण...

शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

राज्यातल्या शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री (तोंडी तक्रार नोंदविण्यासाठी) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, बियाणे, शत आदींची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आपल्या संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

Continue reading

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला

डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षांखालील‌ मुला-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेशशुल्क रुपये १००...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय...

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह...
Skip to content