Homeचिट चॅटएलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठी व्यावसायिक...

एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठी व्यावसायिक प्रशिक्षण

फेडरल एक्‍स्‍प्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनी व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देत जवळपास १०० एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायातल्या सदस्‍यांना अपस्किल करत आहे.

या उपक्रमांतर्गत पात्र एलजीबीटीक्‍यूआयए+ व्‍यक्‍तींना सौंदर्य, शिवणकाम, नृत्‍य, मेकअप व मेहंदी कला अशा विविध क्षेत्रांमध्‍ये व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत. टेक्निकल कौशल्‍यांव्‍यतिरिक्‍त सहभागींना व्‍यक्तिमत्त्व विकास व ग्रूमिंग, नातेसंबंध व्‍यवस्‍थापन, प्रभावी संवाद, तणाव व्‍यवस्‍थापन, टीमवर्क आणि व्‍यक्तिमत्त्व संवर्धन यावरील सत्रांमधून फायदा मिळतो. हा सर्वांगीण दृष्टिकोन सर्वसमावेशक वैयक्तिक व व्‍यावसायिक विकासाची खात्री देतो.

फेडएक्सच्‍या इंडिया ऑपरेशन्‍स व कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍स एमईआयएसएचे उपाध्‍यक्ष सुवेंदू चौधरी म्‍हणाले की, कर्मचारीकेंद्रित तत्त्वानुसार फेडएक्सची स्‍थापना करण्‍यात आली आणि सर्वांचा आदर हे मुलभूत व्‍यवसाय तत्त्व राहिले आहे. आमच्‍या डीईआय कटिबद्धता आमच्‍या संयुक्‍त सांस्‍कृतिक मूल्‍यांशी संलग्‍न

एलजीबीटीक्‍यूआयए

आहेत आणि प्रत्‍येकजण प्रगती करण्‍यास पात्र आहे या विश्‍वासाने मार्गदर्शित आहे. व्‍यावसायिक प्रशिक्षण व रोजगार प्रदान करत आमचा शाश्‍वत उदरनिर्वाहाला चालना देण्‍याच्‍या माध्‍यमातून इक्विटी व सर्वसमावेशकता वाढवण्‍याचा प्रयत्न आहे. सर्वांसाठी सन्‍मान व आदर यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.

कंपनीची समुदाय प्रगतीप्रती कटिबद्धता एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठीदेखील आहे. फेडएक्सने भारतातील हजारो महिला लघुव्‍यवसाय मालकांना साह्य केले आहे. तसेच त्‍यांना सक्षम उपक्रमाचा भाग म्‍हणून त्‍यांचा व्‍यवसाय विकसित करण्‍यास मदत करत आहे. जागतिक स्‍तरावर, फेडएक्सने २००५मध्‍ये एलजीबीटीक्‍यू+ कार्याप्रती पहिले दान केले. २०१७मध्‍ये आपला पाठिंबा दर्शवला आणि तेव्‍हापासून जगभरातील एलजीबीटीक्‍यू+ उपक्रमांसाठी जवळपास २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दान केले आहे.

यूएनडीपी रिपोर्टनुसार, समान रोजगार संधी धोरणांची अंमलबजावणी केलेल्‍या आणि लैंगिक-सर्वसमावेशक संस्‍कृतीला चालना देणाऱ्या व्‍यवसायांची उत्‍पादने व उत्‍पादकतेमध्‍ये सुधारणा होण्‍याची शक्‍यता ६० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. तसेच, या कंपन्‍या अधिक उत्तम प्रतिष्‍ठेचा आनंद घेतात. सहजपणे टॅलेंटचे लक्ष वेधून घेण्‍यासोबत त्‍यांना कायम ठेवतात आणि सुधारित सर्जनशीलता व इनोव्‍हेशन राखतात.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content