Monday, December 23, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटमंदीच्या वातावरणातही एआय,...

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी क्षेत्रात रोजगारात वाढ

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस क्षेत्रामधील रोजगारामध्‍ये वाढ झाल्याचे नोकरी जॉबस्‍पीकच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंग आघाडीचा सूचक एप्रिल २४च्‍या तुलनेत मे महिन्‍यामध्‍ये ६ टक्‍क्‍यांनी वाढला. पण गेल्‍या वर्षाच्‍या मे महिन्‍याच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थिर राहिला. इंडेक्‍स मे २०२३च्‍या तुलनेत २ टक्‍क्‍यांची घट दाखवत २७९९ राहिला. बहुतांश क्षेत्रांनी मध्‍यम-एक अंकी वाढीची नोंद केली. पण आयटी (वार्षिक ० टक्‍के), बीपीओ (-३ टक्‍के) आणि शिक्षण (-५ टक्‍के) यांचा इंडेक्‍स घसरला.

प्रमुख क्षेत्रे जसे ऑईल अँड गॅस (१४ टक्‍के), बँकिंग (१२ टक्‍के) आणि एफएमसीजी (१७ टक्‍के) यांनी उत्तम वाढ केली तर हेल्‍थकेअर आणि ट्रॅव्‍हल अँड हॉस्पिटॅलिटी या प्रत्‍येक क्षेत्राने प्रबळ ८ टक्‍के वाढीची नोंद केली. लहान शहरांनी प्रमुख महानगरीय क्षेत्रांना मागे टाकण्‍याची कामगिरी कायम ठेवली आणि वरिष्‍ठ व्‍यावसायिकांसाठी मोठी मागणी दिसली, ज्‍यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी संधींमध्‍ये उत्तम वार्षिक वाढ झाली.

एफएमसीजी: एफएमसीजी क्षेत्राने वार्षिक १७ टक्‍के वाढीची नोंद केली आणि स्थिरता व वाढ कायम ठेवली आहे. ग्राहकांचे बदलते प्राधान्‍यक्रम, शहरीकरण आणि ई-कॉमर्स विस्‍तारीकरण अशा घटकांना याचे श्रेय जाते. मुंबई व कोलकातामधील हायरिंगमध्‍ये अनुक्रमे ३८ टक्‍के आणि २५ टक्‍के वाढ दिसली. नाविन्‍यता, वितरण कार्यक्षमता आणि बाजारपेठ प्रवेशावर लक्ष केंद्रित करण्‍यासह एफएमसीजी कंपन्‍या सेल्‍स, मार्केटिंग, सप्‍लाय चेन व प्रॉडक्‍ट डेव्‍हलपमेंट अशा कार्यांमध्‍ये टॅलेंटची सक्रियपणे नियुक्‍ती करत आहेत.

एआय-एमएल भूमिकांमध्‍ये शाश्‍वत वाढ: एआय-एमएल टॅलेंटसाठी शाश्‍वत वाढ दिसण्‍यात आली आहे. एआय-एमएलमधील रोजगारांमध्‍ये वार्षिक ३७ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍यामधून कार्यरत कार्यक्षमता, नाविन्‍यता वितरण आणि स्‍पर्धात्‍मकता वाढवण्‍यासाठी एआय तंत्रज्ञानामधील विशेष कौशल्‍य व टॅलेंटप्रती उद्योगाचा विश्‍वास दिसून येतो.

ऑईल अँड गॅस: जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि सर्वसमावेशक नियामक लँडस्‍केपमध्‍ये चढउतार असतानादेखील ऑईल अँड गॅस आणि ऊर्जा क्षेत्रांनी वार्षिक १४ टक्‍के वाढ केली आहे. सर्व अनुभव स्‍तरांवर वाढ निदर्शनास आली असली तरी क्षेत्रात १३ ते १६ वर्षांचा अनुभव असलेल्‍या व्‍यावसायिकांसाठी सर्वाधिक मागणी दिसण्‍यात आली. पायाभूत सुविधा विकास, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्‍प आणि शोध उपक्रमांमध्‍ये सुरू असलेल्‍या गुंतवणुकांमुळे या वाढीला चालना मिळाली आहे.

हेल्‍थकेअर: हेल्‍थकेअर क्षेत्राने बेंगळुरू व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमधील रोजगारामध्‍ये वार्षिक ८ टक्‍के वाढीची नोंद केली. फ्रण्‍टलाइन आरोग्‍यसेवा व्यावसायिकांपासून संशोधक, प्रशासक व टेक्‍नॉलॉजिस्‍ट्सपर्यंत हेल्‍थकेअर इकोसिस्‍टमच्‍या विविध विभागांमध्‍ये टॅलेंटची वाढती गरज आहे.

रोजगार

विकसित होत असलेले प्रादेशिक लँडस्‍केप: मिनी-मेट्रोमधील हायरिंग प्रमुख महानगरीय क्षेत्रांमधील हायरिंगना मागे टाकत आहे. या ट्रेण्‍डमधून लहान शहरी केंद्रांमधील वाढती आर्थिक क्षमता आणि रोजगार संधी दिसून येतात, ज्‍याचे श्रेय शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास आणि आर्थिक क्रियाकलापांचे विकेंद्रीकरण अशा घटकांना जाते. नॉन-मेट्रो शहरे जसे सूरत (वार्षिक +२३ टक्‍के) आणि रायपूर (+२२ टक्‍के) हायरिंग हॉटस्‍पॉट्स ठरले. दिल्‍ली-एनसीआर, चेन्‍नई व हैदराबाद अशा मेट्रो शहरांमध्‍ये स्थिर हायरिंग ट्रेण्‍ड्स निदर्शनास आले. पुण्‍यातील हायरिंग ट्रेण्‍डमध्‍ये काहीशी वाढ झाली. 

अनुभवी व्‍यावसायिकांना उच्‍च मागणी कायम: अनुभवी व्‍यावसायिकांसाठी मागणी उच्‍च राहिली जेथे कामाचा १६ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्‍या उमेदवारांसाठी हायरिंग क्रियाकलापामध्‍ये २३ टक्‍क्‍यांची वाढ निदर्शनास आली. याउलट, फ्रेशर्ससाठी रोजगार बाजारपेठ स्थिर राहिली, ज्यामधून खडतर स्‍पर्धा आणि विकसित कौशल्‍य आवश्‍यकतादरम्‍यान एण्‍ट्री-लेव्‍हल पोझिशन्‍स मिळवण्‍यामध्‍ये करिअरच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्ये असलेल्‍या व्‍यावसायिकांना सामना करावी लागलेली आव्‍हाने निदर्शनास येतात. 

नोकरी डॉटकॉमचे चीफ बिझनेस ऑफिसर डॉ. पवन गोयल म्‍हणाले की, ‘एआय-एमएल डोमेनमधील सातत्‍यपूर्ण रोजगारवाढ अत्‍यंत सकारात्‍मक आहे आणि त्‍यामधून निदर्शनास येते की भारतीय अर्थव्‍यवस्‍था व तेथील टॅलेंट समूह एआयसंदर्भातील जागतिक टेलविंडशी सुसंगत आहेत. तसेच, मे महिन्‍यामधील इंडेक्‍स २०२३च्‍या बेसच्‍या २ टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर राहिले असले तरी बहुतांश नॉन-आयटी क्षेत्रांमध्‍ये उत्तम वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामुळे आमच्‍या रोजगार बाजारपेठेची वैविध्‍यपूर्ण फूटप्रिंट अधिक दृढ झाली आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content