Homeचिट चॅटकायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लाॅ’चे सहाय्यक प्राध्यापक सुकृत देव यांनी केले.

ते एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने मुंबईत आयोजित प्रत्रकार परिषदेत बोलत होते. सोबत प्रा. आदित्य केदारी, जनसंपर्क अधिकारी प्रा. चंद्रकांत बोरुडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी एमआयटी एडीटी विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या पाच वर्षांचा बीबीए- एलएलबी, तीन वर्षांचा एलएलबी, दोन वर्षांचा एलएलएम, एक वर्षांची लीगल जर्नालिझम पदविका आदी कोर्सेसची माहिती दिली.

एमआयटी एडीटी विद्यापीठ हे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीने साकारलेले व विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यातील नोकऱ्यांची संधी ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. आमचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. १२५ एकरमध्ये पसरलेला विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवरील विविध सोईसुविधांनी सुसज्ज आहे. खरेतर एमआयटीची ओळख ही अभियांत्रिकी शाखेच्या शिक्षणासाठी होती आणि आहे. परंतू आता एमआयटी शिक्षण समुह झपाट्याने विस्तारत असताना, काळानुरूप पूरक असे अभ्यासक्रमदेखील विद्यार्थ्यांना पुरवत आहे. त्यातूनच कायद्याच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात सर्वांपेक्षा वेगळे शिक्षण द्यावे यासाठी स्कूल ऑफ लाॅची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता आम्ही विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहोत, असेही प्रा. देव म्हणाले.

लॉ करण्यासाठी तसेच विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी याबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी ७३९१०९५१९३ या क्रमांकावर किंवा solj@mituniversity.edu.in या इमेल आयडीवर संपर्क करावा असे आवाहान प्रा. केदारी यांनी यावेळी केले.

एमआयटी शिक्षण समुहाची ओळख ही पूर्वीपासून इंजिनिअरिंग आणि इतर शाखांसाठी राहिलेली आहे. परंतू आता एमआयटीने आता आपली व्याप्ती वाढवली असून विद्यार्थ्यांसाठी स्कूल ऑफ लॉसारखी काळाजी गरज असणारी शाखा घेऊन आलो आहोत. या शाखेतून विद्यार्थ्याला केवळ कायद्याचे शिक्षण मिळणार नाही तर त्याचा सर्वांगीण विकास होईल अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश तु. कराड यांनी सांगितले.

कायदा समजून घेणे, त्या प्रोफेशनमधून पैसे तर कमावता येतातच पण कायद्याचे ज्ञान असल्यामुळे कुठल्याही अडचणीचे उत्तर मिळविण्याची कुवत विद्यार्थ्यामध्ये येते. कायदेशीर सल्ला देऊन किंवा इतर पद्धतीनेसुद्धा समाजसेवा होते, त्यामुळे कायद्याचे शिक्षण हे महत्त्वाचेच!, स्कूल ऑफ लॉच्या अधिष्ठाता डॉ. सपना देव म्हणाल्या.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content