Homeचिट चॅटप्रबोधन विद्या निकेतनमध्ये...

प्रबोधन विद्या निकेतनमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

मुंबईच्या मालाड येथील प्रज्ञा प्रबोधन संस्था संचालित प्रबोधन विद्या निकेतन शाळेत १५ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन, प्रार्थना करून फुले आणि चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी हर्षला राऊत यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून जीवनात शिक्षण व शिस्तीचे महत्त्व उत्तमरीत्या पटवून दिले. आकांक्षा माने यांनी प्रबोधन विद्या निकेतन या शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शाळेचा इतिहास तसेच शिक्षकांची विद्यार्थ्यां विषयीची तळमळ, आस्था विद्यार्थ्यांना पटवून दिली. मनिषा घेवडे यांनी आयुष्यात एकाग्रता आणि चिकाटी यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले आणि ध्यानाचे प्रात्यक्षिकही घेतले.

प्रबोधन

जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची. पूर्वी १३ जून रोजी सुरू होणारी शाळा अलिकडे १५ जून रोजी सुरू होत असते. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत असतात. त्यांना विविध भेटवस्तू, स्वागताची रांगोळी, भोजन देऊन, शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ, स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते, त्यालाच शाळा प्रवेशोत्सव असे म्हटले जाते.

आसपासच्या परिसरातील होतकरू, शिकण्याची इच्छा असणारे जे विद्यार्थी शाळेच्या तसेच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांनी जरूर संपर्क साधावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रविणा वाडेकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, सचिव विजय मांडाळकर आणि खजिनदार प्रभाकर देसाई यांनी केले.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content