Saturday, July 6, 2024
Homeकल्चर +मोहना कारखानीस यांच्या...

मोहना कारखानीस यांच्या ‘एका’चे प्रकाशन

सिंगापूरच्या मोहना कारखानीस यांनी लिहिलेल्या ‘एका’ या कादंबरीचे तसेच ‘जाईचा मांडव’ आणि ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधल्या एव्हरशाईन हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्रा. जाई म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर तसेच डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, लता गुठे, संजीवनी समेळ, संगीता अरबुने, कौतुक मुळे, फरझाना इकबाल आणि संजय कारखानीस इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!