Homeएनसर्कलयंदा 3288.52 लाख...

यंदा 3288.52 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन

देशात यावर्षी एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. गेल्या 5 वर्षांतील सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष 2023-24साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा तिसरा आगाऊ अंदाज नुकताच जाहीर केला. गेल्या कृषी वर्षापासून, उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पन्नाच्या या आगाऊ अंदाजामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून (एसएएसएएस) मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीची वैधता तपासून, दूरस्थ संवेदक प्रणाली, साप्ताहिक पीकविषयक हवामान निरीक्षक गट आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी ती जोडण्यात आली. त्याबरोबरच, हा अंदाज तयार करताना, वातावरणाची स्थिती, पूर्वीचे कल, दरातील चढउतार, मंडयांमध्ये कृषी उत्पादनांचे आगमन इत्यादी घटकदेखील विचारात घेण्यात आले आहेत.

अन्नधान्य

विविध पिकांच्या उत्पादनांचे तपशील असे-

एकूण अन्नधान्य – 3288.52 लाख टन

  • तांदूळ -1367.00 लाख टन
  • गहू – 1129.25 लाख टन
  • मका – 356.73 लाख टन
  • श्री अन्न– 174.08 लाख टन
  • तूर – 33.85 लाख टन
  • हरभरा – 115.76 लाख टन

एकूण तेलबिया– 395.93 लाख टन

  • सोयाबीन – 130.54 लाख टन
  • रेपसीड आणि मोहरी– 131.61 लाख टन

ऊस– 4425.22 लाख टन

  • कापूस – 325.22 लाख गासड्या (प्रत्येकी 170 किलो)
  • ताग – 92.59 लाख गासड्या (प्रत्येकी 180 किलो)

यावर्षी देशात एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन, वर्ष 2022-23मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या 5 वर्षांत (वर्ष 2018-19 ते 2022-23मध्ये) झालेल्या 3077.52 लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे. यामध्ये खरीपातील पीक उत्पादनाचे अंदाज तयार करताना, पीक कापणी प्रयोगांवर (सीसीईएस) आधारित उत्पन्नदेखील विचारात घेतले आहे.

Continue reading

होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला

डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षांखालील‌ मुला-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेशशुल्क रुपये १००...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय...
Skip to content