Homeचिट चॅटयेत्या रविवारी मुंबईत...

येत्या रविवारी मुंबईत ‘पाऊसवेळा’!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या रविवारी, ८ जूनला संध्याकाळी साडेपाच वाजता ‘पाऊसवेळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी तो विनामूल्य खुला आहे.

पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस.. अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या-जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content