Wednesday, February 5, 2025
Homeहेल्थ इज वेल्थसाताऱ्यात महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला...

साताऱ्यात महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला मिळणार चालना 

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्‍ह्यामधील ग्रामीण भागातल्या महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्‍यविषयक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यावर विशेष भर देण्याच्या उद्देशाने ईझीआरक्‍स (EzeRx) या नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह डायग्‍नोस्टिक सोल्‍यूशन्‍समधील आघाडीच्‍या नवप्रवर्तक कंपनीने जागतिक ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबत सहयोग केला आहे. या धोरणात्‍मक सहयोगाचा प्राथमिक आरोग्‍यसेवांमध्‍ये वाढ करत आयुष्‍मान भारत उपक्रमाला चालना देण्‍याचा मानस आहे.

या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक म्‍हणून ईझीआरक्‍सने साताऱ्यामधील आरोग्‍यसेवा कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्‍यासाठी आपल्‍या चार नाविन्‍यपूर्ण ईझीचेक (EzeCheck) डिवाईसेसना यशस्‍वीरित्‍या लॉन्च केले आहे. हे नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह डिवाईसेस अॅनेमियाच्‍या सर्वोत्तम व्‍यवस्‍थापनाकरिता तपासणी व निदान प्रक्रिया

सुव्‍यवस्थित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. त्‍यांचे युजरअनूकूल स्‍वरूप आणि पोर्टेबिलिटी त्‍यांना ग्रामीण भागांमधील फिल्‍ड ऑपरेशन्‍ससाठी उत्तमरित्‍या अनुकूल बनवतात, ज्‍यामधून महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागांमधील त्‍यांची व्‍यावहारिक उपयुक्‍तता दिसून येते.

ईझीआरएक्‍सचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पार्थ प्रतिम दास महापात्रा म्‍हणाले की, आम्‍हाला सातारा जिल्‍ह्यामधील महिलांच्‍या आरोग्‍यसेवेला प्रगत करण्‍यासाठी या अत्‍यावश्‍यक उपक्रमामध्‍ये पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आमचे ईझीचेक डिवाईसेस आणि सामुदायिक आरोग्‍य अधिकाऱ्यांना देण्‍यात आलेले प्रशिक्षण सर्वांसाठी दर्जेदार आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या आमच्‍या मिशनच्‍या दिशेने मोठे पाऊल आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, हा सहयोग आरोग्‍य निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा करेल आणि महिलांना त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यास सक्षम करेल.

कंपनीने सातारा जिल्‍ह्यामधील सामुदायिक आरोग्‍य अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण सत्राचेदेखील आयोजन केले. या सत्रांना अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुनिल चव्‍हाण, जिल्‍हा फार्मसी प्रमुख अपर्णा भिडे, सातारा जिल्‍हा हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी विकास नामदेव वाडगये आणि पाथ व आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ईझीचेक प्रभावीपणे ऑपरेट करता येण्‍यासाठी आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांना आवश्‍यक कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याकरिता प्रशिक्षण सत्र डिझाइन करण्‍यात आले आहे.

ईझीआरएक्‍सच्‍या सहसंस्‍थापक व सीओओ चैताली रॉय म्‍हणाल्‍या की, पाथ आणि आरोग्‍य विभाग, सातारा जिल्‍हा परिषद यांच्‍यासोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून सर्वांना समान आरोग्‍यसेवा उपलब्‍ध होण्‍याची खात्री घेण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आमच्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत आणि सर्वसमावेशक प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांना सक्षम करत आमचा ग्रामीण भागांमधील महिलांच्‍या अद्वितीय आरोग्‍यविषयक गरजांची पूर्तता करण्‍याचा तसेच समुदायामध्‍ये अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देण्‍याचा मानस आहे. 

Continue reading

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...
Skip to content