Thursday, December 26, 2024
Homeडेली पल्ससचिन तेंडुलकरचा फोन...

सचिन तेंडुलकरचा फोन येण्याची वाट बघू नका!

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे. त्यामुळे, तुम्हाला जर निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणारा प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरचा दूरध्वनी आला तर आश्चर्यचकित होऊ नका! अजूनही मतदनासाठी निघाला नसाल तर लगेच निघा आणि मतदान करा!!

लोकसभा निवडणुकीच्या आज होत असलेल्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यासोबतच, ओदिशा विधानसभेच्या 35 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे.  मतदान सुलभ आणि सुरक्षित वातावरणात संपन्न व्हावे यासाठी पुरेसे शामियाने, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत.  संबंधित मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य यंत्रणांना हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या भागात उष्ण हवामानाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

सचिन तेंडुलकर

मतदारांनी अधिक संख्येने घराबाहेर पडून मतदान केंद्रांवर जावे तसेच जबाबदारीने आणि अभिमानाने मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे. लोकसभा निवडणूक 2024मध्ये आत्तापर्यंत मतदान केंद्रांवर सुमारे 66.95% मतदान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये देशातील सुमारे 451 दशलक्ष लोकांनी मतदान केले आहे.

पाचव्या टप्प्यात ज्या 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत. बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे हे मतदान होत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शहरी मतदारांनी मतदानासाठी उदासीनता दाखवली होती अशा मुंबई, ठाणे, लखनौसारख्या शहरांमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे. या शहरवासीयांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे असे विशेष आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

उर्वरित 3 टप्प्यातील मतदान 1 जूनपर्यंत होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 379 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.

सचिन तेंडुलकर

आजच्या पाचव्या टप्प्याकरीता 94,732 मतदान केंद्रांवर सुमारे  9.47 लाख मतदान अधिकारी 8.95 कोटींहून अधिक  मतदारांचे स्वागत करतील. या मतदारांमध्ये 4.69  कोटी पुरुष; 4.26 कोटी महिला आणि 5409 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदानात 85 वर्षांहून अधिक वयाचे 7.81 लाख मतदार, 100 वर्षांहून अधिक वयाचे 24,792 मतदार तर 7.03 लाख दिव्यांग मतदार असून सुविधेसाठी त्यांना घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडणूक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्यासाठी 17 विशेष रेल्वेगाड्या आणि 508 हेलिकॉप्टर्सची सुविधा पुरवण्यात आली.

153 निरीक्षक (55  सामान्य निरीक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 68 व्यय निरीक्षक ) मतदानाच्या काही दिवस आधीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. सर्वोच्च दक्षता घेण्याच्या दृष्टीने ते बारीक नजर ठेवतील. याशिवाय, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना कोणतेही आमिष देण्यात येऊ नये यासाठी एकूण 2000 भरारी पथके, 2105 अचल निरीक्षण पथके, व्हिडीओ चित्रणाच्या मदतीने नजर ठेवणाऱ्या 881 तुकड्या, आणि ते पाहणाऱ्या 502 तुकड्या   कठोर आणि जलद कारवाई व्हावी या उद्देशाने 24 तास पाळत ठेवणार आहेत.

मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध वाहतुकीवर कडक नजर ठेवण्यासाठी एकूण 216 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि  565 आंतरराज्यीय सीमा तपासणी नाके  कार्यरत  आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे. मतदार https://electoralsearch.eci.gov.in या लिंकद्वारे त्यांच्या मतदान केंद्राचा तपशिल तपासून घेऊ शकतात.

Continue reading

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...
Skip to content