Wednesday, February 5, 2025
Homeडेली पल्ससुनील कुंभार यांनी...

सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

मुंबईत रस्ता साफ करताना सापडलेले जवळपास १५ तोळे सोने मुंबई महापालिकेचे कर्मचारी सुनील कुंभार यांनी पोलिसांकडे दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. पालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रामाणिकपणा पाहून मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कुंभार यांचा सत्कार केला आणि सफाई कामगारांच्या जीवनावर आधारीत असलेल्या नाटकाची दोन तिकिटेही भेट दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातील कर्तव्यक्षमता, सचोटीची उदाहरणे अनेक अधिकारी, कर्मचारी, कामगारांच्या माध्यमातून नेहमीच जनतेसमोर येतात. कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे असेच एक उदाहरण डी विभागातील स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रुपाने समोर आले आहे. महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना आढळलेले अंदाजे १५ तोळे सोने पोलिसांकडे सुपूर्द करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखविला.

भल्या पहाटेपासून मुंबईचा कोपरानकोपरा स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी दररोज आपल्या नजरेस पडतात. न थांबता, न थकता हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी घाम गाळतात. पालिकेच्या डी विभागामध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत कार्यरत सुनील कुंभार रविवारी, १२ मे २०२४ रोजी महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना अंदाजे १५ तोळे सोने (एक सोन्याचे बिस्कीट दहा तोळे), एक सोन्याची वळी पाच तोळे) आढळून आले. त्यासोबत मूळ मालकाचा कोणताही पुरावा नसल्याचे पाहून कुंभार यांनी मुकादम बाळाराम जाधव यांच्याकडे हे सोने सुपूर्द केले. त्यानंतर, त्यांनी नजीकच्या दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीसठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीच्या मालकीचे १५ तोळे सोने सापडल्याची माहिती दिली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन हे सोने त्यांनी पोलीस शिपाई दीपक डावरे यांच्या ताब्यात दिले.

पालिका आयुक्त गगराणी यांना ही माहिती मिळताच त्यांनी सुनील कुंभार आणि मुकादम बाळाराम जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक तर केलेच, यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित अस्तित्त्व, या नाटकाची तिकिटे भेट दिली. तसेच संपूर्ण कुटुंबासह नाटकाला आवर्जून जा, असेही सांगितले. आयुक्त गगराणी यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने कुंभार आणि जाधव यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. गगराणी यांनी आपल्या दालनात त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ प्रदान करून कौतुक केले. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे आदी उपस्थित होते.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content