Homeचिट चॅटमुंबईत वाहन परवाना...

मुंबईत वाहन परवाना चाचण्यांच्या वेळेत बदल

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या परवान्याच्या चाचणीकरीता मुंबईत होणाऱ्या चाचण्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा चाचण्यांसाठी जाणाऱ्या इच्छुकांनी चाचणीची वेळ नव्याने तपासून घ्यावी.

परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहन चालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी  प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहन चालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांची पक्के परवान्याकरिता वाहन चालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती २१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (मेसेज/SMS)देखील पाठविण्यात आले आहेत. तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहवे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content