Homeटॉप स्टोरीचौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात...

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अंदाजे ६० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. अंतीम टक्केवारीत आणखी तीन ते चार टक्के मतांची भर पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये ६७.१२, जळगावात ५३.६५, रावेरमध्ये ६१.३६, जालन्यात ६८.३०, औरंगाबादमध्ये ६०.७३, मावळमध्ये ५२.९०, पुण्यात ५१.२५, शिरूरमध्ये ५१.४६, अहमदनगरमध्ये ६२.७६, शिर्डीत ६१.१३ तर बीडमध्ये ६९.७४ टक्के मतदान झाले.

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात काल सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ८.४३, जळगावमध्ये ६.१४, रावेरमध्ये ७.१४, जालन्यात ६.८८, औरंगाबादमध्ये ७.५२, मावळमध्ये ५.३८, पुण्यात ६.६१, शिरूरमध्ये ४.९७, अहमदनगरमध्ये ५.१३, शिर्डीत ६.८३ तर बीडमध्ये ६.७२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये २२.१२, जळगावमध्ये १६.८९, रावेरमध्ये १९.०३, जालनामध्ये २१.३५, औरंगाबादमध्ये १९.५३, मावळमध्ये १४.८७, पुण्यात १६.१६, शिरूरमध्ये १४.५१, अहमदनगरमध्ये १४.७४, शिर्डीत १८.९१ तर बीडमध्ये १६.६२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ३७.३३, जळगावमध्ये ३१.७०, रावेरमध्ये ३२.०२, जालन्यात ३४.४२, औरंगाबादमध्ये ३२.३७, मावळमध्ये २७.१४, पुण्यात २६.४८, शिरूरमध्ये २६.६२, अहमदनगरमध्ये २९.४५, शिर्डीत ३०.४९ तर बीडमध्ये ३३.६५ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ४९.९१, जळगावमध्ये ४२.१५, रावेरमध्ये ४५.२६, जालनामध्ये ४७.५१, औरंगाबादमध्ये ४३.७६, मावळमध्ये ३६.५४, पुण्यात ३५.६१, शिरूरमध्ये ३६.४३, अहमदनगरमध्ये ४१.३५, शिर्डीत ४४.८७ तर बीडमध्ये ४६.४९ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगावात ५१.९८, रावेरमध्ये ५५.३६, जालन्यात ५८.८५, औरंगाबादमध्ये ५४.०२, मावळमध्ये ४६.०३, पुण्यात ४४.९०, शिरूरमध्ये ४३.८९, अहमदनगरमध्ये ५३.२७, शिर्डीत ५२.२७ तर बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content