Homeचिट चॅट15 सप्टेंबरपूर्वी पाठवा...

15 सप्टेंबरपूर्वी पाठवा पद्म पुरस्कारांसाठी नामांकन

येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2025साठी ऑनलाईन नामांकन/शिफारस प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाईन स्वीकारल्या जातील.

पद्म पुरस्कार म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार ‘उत्कृष्ट कार्याच्या’ सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रे/विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवेसाठी दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “लोकांचे पद्म”मध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्व-नामांकनासह नामांकन/शिफारशी सादर कराव्या. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्ती ओळखून त्यांचे असामान्यत्व आणि कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.

नामांकन/शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीतजास्त 800 शब्द) शिफारस केलेल्या व्यक्तीची तिच्या किंवा त्याच्या संबंधित क्षेत्रातील/विद्याशाखेतील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवा स्पष्टपणे मांडणारा उल्लेख समाविष्ट असावा. या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखालीदेखील उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content