Homeटॉप स्टोरीलोकसभा निवडणुका पाहण्यासाठी...

लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी २३ देशांतले ७५ प्रतिनिधी भारतात!

देशातल्या लोकसभा निवडणुकांचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या २३ देशांचे ७५ प्रतिनिधी सध्या भारतात आले असून महाराष्ट्रासह सहा राज्यांतल्या मतदानाची प्रक्रिया अनुभवणार आहेत.

निवडणूकविषयक एकात्मता आणि पारदर्शकतेचे निदर्शक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वोच्च मापदंड धारण करणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे आयोजन करण्याप्रती कटिबद्धतेचे उदाहरण घालून देत या लोकशाही उत्कृष्टतेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी (ईएमबीज) ही संधी दिली आहे. सहभागाचे प्रमाण आणि आवाका यांच्या संदर्भात अशा

पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम असून यामध्ये भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किरगीझ रिपब्लिक, रशिया, मोल्दोवा, ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलिपाईन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव्ज, पापुआ न्यू गिनी आणि

लोकसभा

नामिबिया अशा २३ देशांमध्ये कार्यरत ईएमबीज तसेच संबंधित संस्थांचे ७५ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस) सदस्य तसेच भूतान आणि इस्रायल या देशांतील माध्यमांचे प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

कालपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात परदेशातील जागतिक निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या (ईएमबीज) प्रतिनिधींना भारतीय निवडणूक यंत्रणेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतर्फे अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींविषयी अवगत करण्यात येईल. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू कार्यक्रमात उपस्थित प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी लहानलहान गटांमध्ये विभागून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांना भेटी देण्यासाठी निघतील. हे सर्वजण तेथील निवडणूक प्रक्रिया आणि विविध मतदारसंघांमध्ये संबंधित तयारीचे निरीक्षण करतील. ९ मे रोजी या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content