Homeएनसर्कलआंतरराष्ट्रीय योग दिनासाठी...

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी सूरतेत ७ हजार लोकांनी केला सराव

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधल्या सूरत इथे योग महोत्सवाचे काल आयोजन करण्यात आले. आठवा लाईन्स इथल्या पोलिस कवायत मैदानावर या महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या योग महोत्सवात सात हजारांपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला.

सकाळी 7.00 वाजता या महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवाला सुरुवात झाल्यापासूनच सर्व सहभागींनी कॉमन योगा प्रोटोकॉल अर्थात सामान्य योग अभ्यासाच्या सरावात स्वतःला झोकून दिले. या सहभागींनी दाखवलेला उत्साह आणि सक्रियतेमधून युवा वर्गाच्या वैयक्तिक तसेच सामाजिक पातळीवरील सुदृढतेमध्ये योगाभ्यासाचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले.

या महोत्सवाला आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल उपस्थित होते. यासोबतच नवी दिल्लीतल्या इंटर युनिव्हर्सिटी एक्सिलरेटर सेंटरचे आणि आणि बेंगळुरुतल्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर योगिक सायन्सेसचे संचालक अविनाशचंद्र पांडे, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे संचालक वैद्य डॉ. काशिनाथ समगंडीदेखील या महोत्सवाला उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या योग मोहत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व तर प्राप्त झालेच, पण त्यासोबतच त्यातून त्यांचे व्यक्ती आणि समाजाच्या उन्नतीसाठीच्या बांधिलकीचे दर्शनही घडले.

सूरतने आपल्या देशाच्या विकासात आमूलाग्र योगदान दिले असल्याचे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आपल्या भाषणात नमूद केले. सूरतला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही म्हणाले. या महोत्सवात सहभागी झालेल्यांनी, महोत्सव यशस्वी होण्यासाठी दाखवलेल्या शिस्तबद्धतेमुळे हा महोत्सव यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

योगाभ्यासाने आता जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे आणि 2023 सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगभरातील 23.5 कोटींहून अधिक लोकांनी योगाभ्यासाचा सराव केला होता असे त्यांनी नमूद केले. यंदाच्या वर्षी सहभागाचे हे प्रमाण वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024च्या 25व्या काऊंटडाऊनच्या निमित्ताने बोधगया इथेही एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

2015मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. योगाभ्यासाचा सराव केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या असंख्य लाभांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तसेच विविध संस्कृती आणि समाजांमध्ये योगाभ्यासाचा समावेश होऊन, त्याचा प्रत्यक्ष सराव होण्याला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे मोठे जागतिक व्यासपीठ ठरले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाने हजारो कुशल योग मास्टर्सची निर्मिती करून आपल्या देशात योगासाठी पोषक वातावरण तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा (एमडीएनआयवाय) चे संचालक डॉ. काशिनाथ समागंडी यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या संचालकांच्या नेतृत्त्वात मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगामधील अभ्यासकांनी कौशल्य दाखवून सामान्य योगा प्रोटोकॉलचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. 5000हून अधिक योगप्रेमींनी या प्रात्यक्षिकांमध्ये सक्रियपणे भाग घेतला.

आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024च्या निमित्ताने ‘100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्था’ या मोहिमेचा भाग म्हणून सामूहिक योग प्रात्यक्षिके आणि सत्रांची  मालिका आयोजित केली गेली आहे. हा उपक्रम शाळा, विद्यापीठे, संस्था, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था, तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह विविध भागधारकांच्या सहकार्याने चालवला जातो.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content